लॉकडाऊन काळात सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचा अभिनव उपक्रम!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jul-2020
Total Views |
Thane_1  H x W:


"ई लर्निंग : ब्लॅकबोर्ड टू ब्रॉडबँड" कार्यक्रमाला जगभरातून २८१७८ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

ठाणे : सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे आणि मुंबई विद्यापिठाच्या वाणिज्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय स्तरावर ३० जून ते ०६ जूलै या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या सातदिवसीय `ई-लर्निंग : ब्लॅकबोर्ड टू ब्रॉडब्रँड` या विनामूल्य ऑनलाईन `विद्यार्थी अध्ययन विकास कार्यक्रमात` तब्बल २८१७८ विद्यार्थी सहभागी झाले. दि. ०६ जुलै रोजी या उपक्रमाच्या शेवटच्या दिवशी ई-व्यवसायाच्या अनुषंगाने `मजकूर लेखन` आणि `डिजिटल विपणन` या विषयांवरील अभ्यासपूर्ण व्याख्यानांचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.


`मजकूर लेखन' या विषयावर डिजिटल विपणन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीत खाते व्यवस्थापक या पदावर कार्यरत असलेल्या काजल हुरीया यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आपल्या व्याख्यानात त्यांनी उदाहरणादाखल डिजिटल क्षेत्राचा सकारात्मक वापर करून अल्पावधीतच, स्वःतमधील कौशल्यगुणांच्या साहाय्याने प्रभावी ठरलेल्या काही व्यक्तींची ओळख करून दिली. तसेच आपल्या क्षमता जाणून ई-व्यवसाय करू ईच्छिणाऱ्या नवोदितांसाठी यु-ट्युब, इन्स्टाग्राम, अनुदिनी यांसारखी अनेक नेटवर्कींग साइटस् प्रारंभीचे एक व्यासपीठ म्हणून उपयुक्त ठरतात, असे त्या म्हणाल्या. यानंतर त्यांनी स्वतःचे यु-ट्युब चॅनल कसे तयार करावे, स्वतःमधील कौशल्यगुण ओळखून त्यावर आधारित, प्रभावी व इतरांना आकर्षित करून घेण्याची क्षमता असलेल्या मजकुराच्या साहाय्याने व्हिडीओ कसे तयार करावे, यु-ट्युब चॅनलच्या मदतीने पैसे कसे मिळवावेत व त्यासंबंधीचे निकष काय आहेत याबाबत मार्गदर्शन केले. स्वतःचे अनुदिनी खाते, संकेतस्थळ कसे तयार करावे, याबाबत मार्गदर्शन केले. आपल्या वैयक्तिक अनुदिनी किंवा संकेतस्थळावरील माहिती ही पूर्णतः स्वरचित असावी, इतर कुणाचेही अनुकरण करणे हा गुन्हा ठरतो, असे त्या म्हणाल्या.


दुसऱ्या सत्रात सायबर सुरक्षा, ॲडव्हान्स एक्सेल, यांसारख्या अनेक विषयांसाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून २३ वर्षांपासून `कार्पोरेट ट्रेनर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जास्मिन दावडा यांनी `डिजिटल विपणन` या विषयावर विद्यार्थ्यांशी संपर्क साधला. कॅनवा या संकेतस्थळाच्या साहाय्याने आपल्या व्यवसायाला गती देण्यासाठी प्रभावी व आकर्षक मजकूर कसा तयार करावा,ते प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितले.


दुसऱ्या सत्रानंतर निरोप समारंभाच्या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रशेखर मराठे यांनी संस्थेचे अध्यक्ष सतीश प्रधान, सचिव कमलेश प्रधान, खजिनदार सतीश शेठ, व्यवस्थापन सदस्य मानसी प्रधान, यांच्या सकारात्मक पाठींब्यासाठी कृतज्ञता व्यक्त केली. या उपक्रमास देशातील २६ राज्ये व ५ केंद्रशासित प्रदेशांतील आणि जगातील १५ राष्ट्रांमधून (नायजेरिया, हॉंगकॉंग, कुवेत, नेपाळ, घाना, इथिओपिया, ओमान, यु.के, यु.एस संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, भूतान, मलेशिया, श्रीलंका, इंडोनेशिया) तब्बल २८१७८ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.



@@AUTHORINFO_V1@@