भारतीय वायूसेनेचे भारत-चीन सीमेवर ‘नाईट ऑपरेशन’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jul-2020
Total Views |

indo china_1  H




नवी दिल्ली :
पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमध्ये सुरू असलेला तणाव आता कमी होताना दिसत आहे. सोमवारी चिनी सैन्याने काही किलोमीटर माघार घेतली आहे. सोमवारी रात्री भारतीय हवाई दलाच्या अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरने भारत-चीन सीमेजवळील फॉरवर्ड एअरबेसवर नाईट ऑपरेशन केले. अपाचे, चिनूक, मिग २९ यासह हवाई दलातील अनेक विमान रात्री उशिरा येथे उड्डाण करताना दिसले. त्यांच्यामार्फत चीनवर बारीक लक्ष ठेवले गेले.



भारताने सीमेनजीक अतिरिक्त सैन्य बळ वाढवलं आहे तसेच लष्कराने कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयारी केली आहे. याचाच एक भाग म्हणून भारतीय वायूदलानेही लढाऊ विमानं सीमेजवळील एअरबेसवर तैनात केली आहे.याबाबत ज्येष्ठ लढाऊ पायलट ग्रुप कॅप्टन ए राठी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, नाइट ऑपरेशन हे एखादे सरप्राइज सारखे असते ,ज्यामुळे वायूसेना आधुनिक प्लॅटफोर्म आणि प्रेरित सैन्याच्या मदतीने कोणत्याही वातावरणात ऑपरेशन पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षित आणि तयार राहते.अपाचे हेलिकॉप्टरने भारत-चीन सीमेवर नजर ठेवण्यासाठी उड्डाण केले. वायुसेना सीमेवर सतत सराव करीत असून सर्व प्रकारच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे. फक्त अपाचेच नाही तर चिनूक हेलिकॉप्टरनेही येथे सराव केला. यापूर्वी मिग -२९सह इतर अनेक लढाऊ विमान लेहच्या आकाशात उडताना दिसले.

@@AUTHORINFO_V1@@