कोरोनामुळे यंदा श्रावण महिन्यात काशीत शांतता!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jul-2020
Total Views |

Kashi_1  H x W:




हजारो भाविकांऐवजी फक्त ५ भक्त; जलाभिषेकालाही परवानगी नाही


वाराणसी : भगवान महादेवाची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या काशीमध्ये कोरोनामुळे यावर्षी श्रावणाचा उत्साह दिसून येत नाही. घाटापासून गल्ल्यासुद्धा ओस पडल्या आहेत. श्रावणात पहिल्या सोमवारी १२ ज्योतिर्लिंगापैकी एक श्री काशी विश्वनाथाच्या मंदिरात भाविक व देवात अंतर पाळण्यात आले. कोरोनामुळे कोणत्याही भाविकांस गर्भगृहात जाण्याची परवानगी नव्हती. जलाभिषेकासही बंदी घालण्यात आली आहे. दर सहा तासाला मंदिराचे सॅनिटायझेशन केले जात आहे. मंदिरात फक्त पाच भाविकांसाठीच परवानगी देण्यात आली आहे. पूर्वी मंदिराबाहेर भाविकांच्या लांबच लांब रांगा असत. परंतु या वेळी भाविकांनी काळजी घेतली होती. प्रशासनाने सोमवारी फक्त २५ हजार भाविकांना दर्शनाची परवानगी दिली होती. तर पूर्वी सोमवारी सुमारे दोन लाखांवर भाविक दर्शनासाठी येत होते.


दुसरीकडे गौदौलियापासून मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर सुरक्षा कर्मचारी जास्त आणि भाविकांची संख्या कमी असे दृश्य होते. ठिकठिकाणी कावडी घेऊन येणाऱ्या लोकांचे तळ यावर्षी दिसून आले नाहीत. कोरोनामुळे श्रावणात आयोजित विविध धार्मिक कार्यक्रम यावर्षी होणार नाहीत. याशिवाय नागपंचमीला काशीमध्ये नागकूपला विद्वतजनांच्या उपस्थितीत पारंपारिक शास्त्रार्थ कार्यक्रम होणार नाही. गर्भगृहाबाहेर चारही दरवाजांना जलार्पण करण्याची सुविधा असेल, असे आयुक्तांनी सांगितले.


भाविकांसाठी प्रथमच ऑनलाइन रुद्राभिषेकांची सुविधा आहे. स्पीड पोस्टने प्रसाद पाठवण्यात येणार आहे. यासाठी २५० रु. शुल्क आहे. मंदिरात रुद्राभिषेक व आरतीसाठी ३०% शुल्क वाढणार आहे. प्रथमच मंदिरात जलाभिषेकास ५ लोक उपस्थित राहण्याची परवानगी आहे. काशीच्या सीमेवर पोलिस तैनात आहेत. बाहेरगावाहून कोणी भाविक आल्यास त्याला परत पाठवण्यात येत आहे.






@@AUTHORINFO_V1@@