समयी अभाविप येते कामा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jul-2020
Total Views |


ABVP 3_1  H x W
केंद्र शासनाने ‘लॉकडाऊन’ घोषित केले आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप)विद्यार्थ्यांसाठी तत्काळ मदत मिळावी याकरिता सेवा उपक्रमांची सुरुवात केली. अभाविपने कोरोना संकटकाळात जनसेवेसाठी मदत केंद्रेच सुरू केली.


महाराष्ट्राचे बहुतेक विद्यार्थी हे सुरुवातीच्या काळातच आपल्या गावी परत जाऊ लागले. अडचण झाली ती विविध राज्यांतून आणि विशेष करून ईशान्येकडील राज्यांतून आलेल्या विद्यार्थ्यांची. या विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्‍या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी अभाविपने रेशन किट वितरण, भोजन वितरण आणि गॅस सिलिंडर भरून देणे सुरु केले, याचा ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांना मोठा उपयोग झाला. साधारणपणे २५०० ईशान्येकडील विद्यार्थ्यांना घरपोच रेशन आणि बचाव किट देण्यात आले. सोबतच स्थानिक कार्यकर्ते त्यांना जोडून दिल्यामुळे त्यांची सुरक्षितता आणि इतर आवश्यक सर्व मदत मिळवून देण्यात आली. या कामाची दखल घेत मणिपूर राज्याचे मुख्यमंत्री बीरेन सिंघ आणि सामाजिक न्यायमंत्री नेमचा किप्गेन यांनी ट्विटरद्वारे अभाविप पुण्याचे आभार मानले. अभाविपमध्ये नियमित गायले गेलेल्या गीताच्या ओळी ‘कोई ना भूका कोई ना पिछड़ा यही अटल कर्तव्य हमारा’ हेच या सेवा प्रकल्पाचे ब्रीदवाक्य बनले.



ABVP 2_1  H x W 
 
 
पुढील काळात अशीच अडचण आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची झाली. या विद्यार्थ्यांना मदत करण्याकरिता ‘थेीश्रव जीसरपळीरींळेप ेष र्डीींवशपीीं रपव र्धेीींह’ या जागतिक संघटनेची मदत घेण्यात आली. यामुळे या विद्यार्थ्यांना त्यांच्या संस्कृतीप्रमाणे जेवण पुरवण्यात आले. विशेष करून रमजानच्या काळात मुस्लीम देशातील विद्यार्थ्यांचा उपवास लक्षात घेऊन त्यांना मदत करण्यात आली. या प्रयत्नांमुळे नक्कीच या विद्यार्थ्यांच्या मनात आणि त्यांच्या देशात भारताबद्दल प्रेम आणि आदरभाव निर्माण झाला असेल. ‘लॉकडाऊन’च्या दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यात विद्यार्थी विशेष परवानगी घेऊन मोठ्या प्रमाणात घरी जाण्यासाठी निघाले अशा विद्यार्थ्यांसाठी आणि प्रवासी मजुरांसाठी अभाविप कार्यकर्ते प्रवासी किट, बचाव किट आणि तीन दिवस प्रवासात पुरेल आणि टिकेल असे भोजन, रेल्वे स्थानकावर वितरीत करत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पुणे महानगरपालिका यांच्यासोबत मिळून अभाविप कार्यकर्त्यांनी पुण्यातील विविध भागात जलद तपासणी केली, सोबतच आयुष मंत्रालयाने सुचवलेल्या औषध आणि मास्कचे वाटप केले. कोरोनाची लागण होण्याची शक्यता असताना कार्यकर्त्यांनी स्वतःच्या घरापासून महिनाभर लांब राहून हेही कार्य पूर्ण केले. विशेष करून जिज्ञासा म्हणजेच आयुर्वेद आणि होमियोपॅथीचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनींनी या उपक्रमात पुढाकार घेतला. या तरुणींनी भवानी पेठ आणि ताडीवाला रोड सारख्या सर्वात जास्त संक्रमित भागात जलद तपासणी केली.



ABVP 1_1  H x W 
 
 
 
सॅनिटायझर, मास्क, रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारे होमियोपॅथी औषध आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चॉकलेटचे बॉक्स असलेले विशेष किट तयार करण्यात आले. पोलीस बांधव, आरोग्य अधिकारी, स्वच्छता कर्मचारी आणि डॉक्टर यांना या किटचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर विद्यापीठ आणि विविध शैक्षणिक संस्थांचा एक हजार सफाई कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांना रोगप्रतिकारकशक्ती वाढवणार्‍या होमियोपॅथी औषधाचे वाटप करण्यात आले. अभाविपच्या राष्ट्रीय महामंत्री सुश्री निधी त्रिपाठी यांनी कार्यकर्त्यांना रक्तदानाकरिता आवाहन केले. याला प्रतिसाद देत पुण्यातही कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. त्याचबरोबर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी ५१ हजार रुपये ‘पीएम केअर फंड’मध्ये जमा केले आहेत. याकरिता अभाविपने कार्यकर्त्यांना आणि विद्यार्थ्यांना आपल्या खर्चातील एक भाग देण्याचे आवाहन केले, त्याला विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. वारकर्‍यांना वैद्यकीय सेवा सुविधा देण्याची मोठी परंपरा राहिली आहे, यासाठी ‘डॉक्टर वारकर्‍यांच्या दारी’ ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. या माध्यमातून कार्यकर्ते पुण्यातील कोरोना प्रभावित भागात वैद्यकीय शिबीर, रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारे औषध आणि मास्कचे वाटप करत आहेत. आता पर्यंत पाच हजारांपेक्षा अधिक कुटुंबाना या शिबिरांचा लाभ मिळाला आहे. कोरोना संकटकाळात विद्यार्थ्यांना वसतिगृह मोफत उपलब्ध व्हावे त्यांना रूममधून बाहेर काढू नये याकरिता अभाविप सजगतेने कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना घरबसल्या अभ्यास करता यावा याकरिता ऑनलाईन लेक्चर घ्यावी, अशी मागणीसुद्धा विद्यापीठाकडे अभाविपने केली आणि त्यातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘ए-ठएडजणठउए’ मोफत उपलब्ध करून दिले आहेत. अभाविप पुणेच्या फेसबुक पेज वरूनही विद्यार्थ्यांसाठी नियमित लाईव्ह सेशन आणि विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे याचाही हजारो विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे.


 
कोरोनामुळे पुण्यातील शैक्षणिक परंपरेचे खूप मोठे नुकसान होणार आहे. मध्यमवर्गातील विद्यार्थी हा पुण्यामध्ये शिक्षणासाठी दरवर्षीच्या तुलनेत कमी येईल. त्यामुळे हॉस्टेल, शिक्षण संस्था, मेस, दुकानदार, खोली भाड्याने देणार मालक या सर्वांच्या अर्थचक्रावर विपरीत परिणाम पुढील काही महिन्यात दिसू शकतो. तरीही परगावातील जे विद्यार्थी प्रवेश घेतील, त्यांच्यावर अधिक आर्थिक भार पडू शकतो. भीतिदायक वातावरण असल्यामुळे प्रवेश कमी होणार त्यामुळे खासगी शिक्षण संस्था कदाचित जबरदस्त आर्थिक अडचणीत सापडतील. कदाचित बंद ही पडतील ज्यामुळे पुढील काही वर्षांत पुण्याची ऐकून प्रवेश क्षमता कमी होईल, अशी भीती शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. कोरोना संकट संपल्यानंतर प्रवेश, निवास आणि भोजन व्यवस्था हा तर प्रश्न राहील, पण शैक्षणिक परिवारातील सकारात्मक वातावरण निर्माण करणे, टिकवणे आणि वाढवणे यासाठीही उपक्रम करावे लागतील. ऑनलाईन लेक्चर आणि सेमिनारची सवय आणि जे महत्त्व आले आहे त्यातून पुन्हा पारंपरिक वर्ग, शिक्षण आणि विद्यापीठ परीक्षेचे महत्त्वसुद्धा प्रयत्नपूर्वक प्राप्त करून देण्यासाठी काम करावे लागेल. आरोग्यविषयक सत्र, योग आणि आहाराविषयी जागरूकता विद्यार्थ्यामध्ये आणावी लागेल, याकरिता आता अभाविप कार्यकर्ते तयारी करीत आहेत. कोरोनाच्या संकट काळात अभाविपच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांनी हे सिद्ध केले आहे की, विद्यार्थी हा उद्याचा नाही तर आजचा नागरिक आहे. संकट कितीही मोठे असो पण त्याला सामर्थ्याने तोंड देण्याची क्षमता फक्त विद्यार्थी आणि तरुणामध्ये आहे. समाजात आणि शैक्षणिक क्षेत्रात पुन्हा नव्याने शाश्वत विकास करण्याचा विचार समाजसेवेने झपाटलेल्या अभाविपने केला आहे.
 

- शुभम अत्रे
(लेखक अभाविप, पुणे, संघटन मंत्री आहेत)

@@AUTHORINFO_V1@@