दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jul-2020
Total Views |


mulund_1  H x W



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर संपूर्ण ‘लॉकडाऊन’ जाहीर केल्यानंतर ‘संघावाचून कोण स्वीकारील काळाचे आव्हान’ ही उक्ती डोळ्यांपुढे ठेवून कोरोना आपत्ती काळात रा. स्व. संघाने स्वयंसेवकांना मदतीसाठी उतरण्याचे आवाहन केले आणि देशभर सेवायज्ञ सुरु झाला. त्यासंदर्भातच मुलुंड भागाने सेवायोजनेची आखणी करून अंमलबजावणी केली.मुलुंड भागात एकूण सात नगरेआहेत. मुलुंड(पूर्व), मुलुंड (पश्चिम), भांडुप (पूर्व), भांडुप (पश्चिम), राजेंद्रप्रसाद नगर, झुलेलालनगर व केशवनगर अशी नगरे मिळून मुलुंड भागाची रचना आहे. तेथील सेवाकार्याचा घेतलेला हा आढावा...


मुंबईमधील कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, गेल्या तीन महिन्यांपासून समाजातील गरजू लोकांना शोधून त्यांच्यापर्यंत धान्य/शिधाकिट पोहोचविण्याचे काम मुलुंड भागातील संघ स्वयंसेवकांनी सुरु केले. कोरोना महामारीमध्ये कर्तव्य बजावणार्‍या वाहतूक पोलीस, मुंबई पोलीस, सफाई कर्मचारी वर्ग यांना सकाळ, दुपारचा चहा-न्याहारी देण्याचे कामसुद्धा मुलुंड भाग संघातर्फे करण्यात आले. या सेवाकार्यात राष्ट्र सेविका समितीच्या महिला वर्गाचा सहभाग होता. रोज ५०० तयार अन्नाची पाकिटे मुलुंड-भांडुप परिसरात वाटली गेली. आजपर्यंत साधारण ४,२०० गरजू कुटुंबांपर्यंत धान्य/शिधाकिट आणि २५ हजार अन्नाची पाकिटे यांचे वाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या सेवेमध्ये समाजातील सर्वस्पर्शी, सर्वव्यापी प्रमाणे किन्नर समूह, रिक्षाचालक, रोजंदारीवर पोट भरणारे या सगळ्यांचा समावेश आहे.

 


या काळात हजारो स्थलांतरित, श्रमिक वर्ग मुलुंड, लालबहादूर शास्त्री मार्गाने पायी प्रवास करत असताना मुलुंड चेकनाका, तीन हात नाका माजिवडा, आर मॉल या ठिकाणी १२ मे ते १७ मे दरम्यान पंधराशे ते दोन हजार लोकांना पुरी-भाजी, खिचडीचे वितरण स्थानिक संघकाय कर्र्त्यांमार्फत करण्यात आले. ‘भारत विकास परिषद’ व अन्य सामाजिक संस्थांमार्फत चालू असलेल्या भोजनगृहामार्फत भोजनाच्या पाकिटांची व्यवस्था करण्यात आली होती. विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांचाही भोजनवितरणमध्ये सहभाग होता. कोरोना महामारीच्या संकटावर मात करण्यासाठी खासगी डॉक्टर्सना त्यांचे क्लिनिक, दवाखाने सुरू करण्याकरिता आवश्यक पीपीई किट, मास्क देण्याचे कामसुद्धा करण्यात आले. रा. स्व. संघ, जनकल्यर्ची समिती, नॅशनल मेडिकल ऑर्गनायझेशन, निरामय फाऊंडेशनमार्फत मुलुंड भागातील १६ डॉक्टर्सना पीपीई किट्स, मास्क, सॅनिटायझर्सचे वितरण करण्यात आले. घाटकोपर ते मुलुंड परिसरातील १०० डॉक्टरांना २०५ पीपीई किट्सचे वाटप करण्यात आले. आपदाकार्यात उतरलेल्या संघ स्वयंसेवकांनासुद्धा २९८ मास्क, १७५ सॅनिटायझर्सचे वाटप करण्यात आले. समाजात आरोग्याविषयी जनजागृती करणे आवश्यक असताना, मुलुंड कॉलनी येथील गणेशपाडा येथे स्थानिक नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. ‘भारत विकास परिषद’ व ‘मोहनलाल शिक्षण संस्था’ या संस्थांचे सहकार्य या शिबिराला लाभले. एकूण ३२२ नागरिकांची तपासणी करण्यात आली. रोगप्रतिकारकशक्ती वाढवणार्‍या होमियोपॅथी गोळ्या ‘आर्सेनिक अल्बम-३०’ सर्व कुटुंबांपर्यंत पोहोचवण्याची योजनाही कार्यान्वित केली आणि ही योजना अधिकाधिक सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुलुंड-भांडुप परिसरातीलमधील २५ हजार कुटुंबांना या गोळ्या वाटण्यात आल्या. जागतिक परिचारिका दिनानिम्मित भांडुप, मुलुंड परिसरातील महानगरपालिका तसेच खासगी रुग्णालयातील परिचारिका, डॉक्टर्स व इतर कर्मचार्‍यांना न्याहारी व भोजन देण्याची व्यवस्था केली होती. भांडुपमधील तीन महापालिका रुग्णालये तसेच २५ खासगी रुग्णालयांत २२५ न्याहारी पाकिटांचे वितरण केले. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मुलुंड (पूर्व) येथील वीर सावरकर महानगरपालिका दवाखान्यात रोज डॉक्टर्स तसेच अन्य कर्मचार्‍यांना दुपारचा चहा देण्याचे काम संघ स्वयंसेवकांमार्फत करण्यात येत आहे.


नर सेवा ही नारायण सेवा!


दि. २८ मे ते २ जून या कालावधीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व ‘निरामय फाऊंडेशन’तर्फे ‘कोरोना चिकित्सा अभियान’ विविध वस्त्यांमध्ये राबवले गेले. हे चिकित्सा अभियान भांडुप येथील प्रतापनगर, हनुमाननगर येथील दाट लोकवस्तीमध्ये करण्यात आले. या समूहात अभियानाच्या पहिल्या तुकडीमध्ये एकूण २३ स्वयंसेवक सहभागी झाले होते त्यामध्ये पाच डॉक्टर्स होते. सध्या दुसरी तुकडी चिकित्सा अभियानात चेंबूर येथे काम करत आहे. तसेच स्थानिक वस्त्यांतील १९ सामाजिक मंडळांचा सहभाग आहे. स्थानिक मंडळं, संस्था, महापालिका यांच्याशिवाय हे अभियान सफल होणे अवघड असल्यामुळे त्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे. हे अभियानू मुंबई महापालिकेबरोबर राबविले गेले. यात संघाच्याच माध्यमातून डॉक्टर्स व साहाय्यक म्हणून स्वयंसेवकांनी काम केले. तसेच रविवारी १४ जून रोजी झालेल्या एकदिवसीय कोरोना चिकित्सा अभियानात घाटकोपर ते मुलुंड परिसरातील १६० स्वयंसेवक सहभागी झाले होते. चेंबूर येथील शिवाजी नगरपरिसरात हे अभियान पार पाडले. या सगळ्यात फार मोठा वाटा विविध क्षेत्रातील सामाजिक संस्थांचाही आहे. राष्ट्र सेविका समिती, विश्व हिंदू परिषद, संस्कार भारती, बजरंग दल ,भारत विकास परिषद, मोहनलाल शिक्षण संस्था, या संस्था समन्वयाने जोडल्या गेल्या. तसेच अशा सेवाकार्यात उतरलेल्या ३५ स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते विविध उत्सव मंडळे यांच्याशीही संपर्क साधून समन्वयातून सेवा देणार्‍या संस्थांना या कार्यात सहभागी करून घेतले. रा. स्व. संघाची समाजाबरोबर आणि समाजात राहून काम करण्याची हीच पद्धत आहे. म्हणूनच समाजाकडूनही त्याची पोचपावती मिळत असते. म्हणूनच खालील ओळी मनात आल्या शिवाय राहत नाहीत.
 

दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती!

 

- रोहन शिंत्रे

@@AUTHORINFO_V1@@