उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला १० वर्षे मागे नेले : नारायण राणे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jul-2020
Total Views |

uddhav_1  H x W



उद्धव ठाकरे निष्क्रिय मुख्यमंत्री; नारायण राणे यांचा प्रहार


मुंबई : उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री असून, त्यांनी महाराष्ट्राला १० वर्षे मागे नेले आहे, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीवर आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका केली.


मुंबई येथील भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत राणे बोलत होते. ते म्हणाले की, हे मुख्यमंत्री मातोश्रीतून कधी बाहेर पडत नाहीत, बाहेर पडले तर कधी काही बोलत नाही आणि मंत्रालयात कधी बसतच नाही. जो मंत्रालयात येऊ शकत नाही तो मुख्यमंत्री हवाच कशाला, असा प्रश्नही राणे यांनी केला.


मंत्रालयात मुख्यमंत्र्यांचे नव्हे, तर अधिकाऱ्यांचे राज्य झाले आहे. महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाही, मंत्रालय नाही, सामान्य माणसाची कुणाला चिंता नाही. बदल्या कोण करतो आहे कळत नाही, ताळमेळ नाही, काय चाललेय काही समजत नाही, असेही राणे यावेळी म्हणाले. अधिकारी निर्णय घेतात ते मुख्यमंत्र्यांना माहीत पडत नाहीत. त्यामुळे झालेल्या बदल्या रद्द करायला तातडीच्या बैठका घ्याव्या लागतात. बदली प्रकरणावर मात्र तात्काळ बैठका होतात. झालेल्या बदल्या तात्काळ रद्द होतात. यांच्याकडे बदल्यांसंदर्भात बैठका घ्यायला वेळ आहे, पण कोरोना संदर्भात बैठका घ्यायला वेळ नाही. त्यावेळी हे मुके होतात आणि एकच शब्द उच्चारतात... लॉकडाऊन. पण किती वेळ लॉकडाऊन ठेवायचा, काही मर्यादा आहे की नाही.


हे सरकार जनतेची परिस्थिती थांबवू शकत नाही. महाराष्ट्राच्या जनतेसाठी हे सरकार घातक आहे. महाराष्ट्रात कोरोनाने असंख्य मृत्यू होत आहे. त्यामुळेच हे सरकार सत्तेत राहणे योग्य नाही. त्यासाठीच मी राष्ट्रपती राजवटीची मागणी केली होती, असेही राणे यावेळी म्हणाले.


कोकणात निसर्ग चक्रीवादळ झाले. मुख्यमंत्र्यांनी केवळ मोठ्या घोषणा केल्या. पण आजपर्यंत एक पैसाही मिळालेला नाही. राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. सुरक्षारक्षक, पालिका कर्मचारी, बेस्ट कर्मचारी यांचे तीन तीन महिने पगार होत नाहीत. कसे जगायचे त्यांनी? बेस्टमध्ये अनेक वर्षे चेअरमन होतो. बेस्टसारखा नफ्यात चालणारा दुसरा व्यवसाय नाही. पण तोही त्यांनी डबघईस आणला.दिवाळखोरीत गेलेली बेस्ट खासगीकरणाच्या दिशेने जात असल्याचीही टीका राणे यांनी केली. गेल्या २५ वर्षात त्यांनी विकासाचे काम केलेच नाही, अशी टीकाही राणे यांनी केली.


आज मुंबईसारखे जागतिक दर्जाचे शहर भकास होत चालले आहे. याला जबाबदार शिवसेना आहे. मुंबई महानगरपालिकेत जितका भ्रष्टाचार आहे, तसा अन्य कुठल्याही संस्थेत नाही, असा टोलाही राणे यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांना पंढरपूरच्या शासकीय महापुजेचा मान मिळाला. पण त्यांनी तिथे जाऊन काय केले? विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवले का? विठ्ठलाला हार घातला का, टिळा लावला का? प्रसाद दिला-घेतला का?मग तिकडे जाऊन काय केले? हिंदू आहेत ना हे, असा प्रश्नही राणे यांनी विचारला.





@@AUTHORINFO_V1@@