किरीट सोमय्यांचा पोलीसांचे प्रश्न जाणून घेण्यावर भर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jul-2020
Total Views |
Kirit Sommaiya _1 &n





कांजूरमार्ग-विक्रोळी पोलीस ठाण्याला दिली भेट


मुंबई : सरकारने मुंबई पोलीसांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचे मत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केले आहे. मुंबई पोलीसांना कोरोना पासून वाचवण्यासाठी एक्शन प्लानची मागणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. याच पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी विक्रोळी आणि कांजूरमार्ग या पोलीस ठाण्याला भेट दिली. विक्रोळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय दळवी आणि कांजूरमार्गचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद ओवाळ यांच्याशी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा त्यांनी केली. 




कोरोनाशी लढा देत असताना पोलीस कुटूंबियांच्या मनाची होत असलेली घालमेल त्यांनी जाणून घेतली. तसेच विविध मुद्द्यांवरही त्यांनी चर्चा केली. शनिवारी राज्यात एकूण ४ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.तर ३० जणांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे. तर आतापर्यंत राज्यातील एकूण ५२०५ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना झाला होता. त्यापैकी ४०७१ पोलीस कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या १०७० पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत.









@@AUTHORINFO_V1@@