ऊर्जावर्धक - रोगप्रतिकारक ‘अश्वगंधा’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jul-2020
Total Views |


as_1  H x W: 0



‘पितांबरी’ने ‘अश्वगंधा’ वनस्पतीवर संशोधन करुन शास्त्रशुद्ध पद्धतीने अश्वगंधा वनस्पतीच्या अर्कापासून ‘अश्वगंधा-टॅब्लेट’ची निर्मिती केली आहे. त्यामुळे ‘पितांबरी अश्वगंधा‡टॅब्लेट’मधून ‘अश्वगंधा’ वनस्पतीची कार्यकारी तत्त्व जशीच्या तशी आपल्याला मिळतात. ‘अश्वगंधा’ वनस्पती ही उत्कृष्ट ‘इम्युनोस्टिम्युलेटर’ आहे. अश्वगंधातील ‘विथेनॉन’ हे रसायन शरीरातील कोशिकांमध्ये (सेलमध्ये) घातक विषाणूचा प्रवेश थांबवून रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी मदत करते. त्यामुळे कोरोनासोबतच इतर कोणतेही आजार झालेल्या रुग्णांचे व्हायरल इन्फेक्शनकमी करुन त्यांच्या शरीरातील नैसर्गिक संरक्षण प्रणाली अर्थात रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी पितांबरी अश्वगंधा-टॅब्लेट’चा सर्वाधिक फायदा होऊ शकतो.
 
 

‘कोविड-१९’ या विषाणू संसर्गाच्या प्रसारामुळे संपूर्ण जगातील मानवजातीला धोका निर्माण झाला आहे. या विषाणूला रोखण्यासाठी अद्याप तरी प्रभावी लस किंवा औषधोपचार उपलब्ध नसल्यामुळे प्रत्येकाने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे. अशावेळी ‘कोविड-१९’ विषाणूवर मात करण्यासाठी ‘आयुष मंत्रालया’तर्फे रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे उपाय आणि आरोग्य राखण्यासाठी प्रतिबंधात्मक सूचना विविध माध्यमातून सांगण्यात येत आहेत. मध्यंतरी आयुष मंत्रालयाकडून रोगप्रतिकारकशक्ती वाढवणार्‍या अश्वगंधा, गुडुची (गुळवेल), मुलठी अशा काही आयुर्वेदिक वनस्पतींचे काढा स्वरुपात, तसेच चूर्ण स्वरुपात सेवन करण्याचे आवाहनही करण्यात आले होते. त्यामुळे भारतीय आयुर्वेदामध्ये ‘बहुगुणी’ म्हणून वर्णिलेल्या अनेक वनस्पतींपैकी ‘अश्वगंधा’ या वनस्पतीकडे सार्‍या जगाचे लक्ष वेधले गेले आहे.

‘अश्वगंधा’ शब्दाचा अर्थ सांगायचा झाला तर ‘अश्व’ म्हणजे घोडा आणि ‘गंधा’ म्हणजेच घोड्याच्या आजुबाजूला असणारा वास असणारी वनस्पती. नावाप्रमाणेच ‘अश्वगंधा’
मनुष्यास घोड्याप्रमाणे ‘शक्ती’ आणि ‘बळ’ प्रदान करते. बलवर्धक आणि उत्साहवर्धक वनस्पती हे ‘अश्वगंधा’चे मुख्य वैशिष्ट्य आहे. म्हणूनच ‘अश्वगंधा’ ही वनस्पती मनुष्याच्या अंगातील उत्साह-ऊर्जा (जोम) वाढविण्यास तसेच आजारी व्यक्तीमध्ये रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास उपयुक्त वनस्पती मानली जाते. त्याचप्रमाणे यातील अनेक औषधी गुणधर्मांमुळे विविध आजारांवरील औषधांमध्ये ‘अश्वगंधा’चा वापर केला जातो. हेच ओळखून अभिनव उत्पादनांची निर्मिती करणार्‍या ‘पितांबरी’ कंपनीकडून गेल्या तीन वर्षांपासून शास्त्रशुद्ध पद्धतीने अश्वगंधा वनस्पतीच्या अर्कातून ‘अश्वगंधा टॅब्लेट’ची निर्मिती केली जात आहे.
आरोग्य राखण्याच्या कामी शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रणाली म्हणजेच ‘रोगप्रतिकारकशक्ती’ महत्त्वाची भूमिका बजावत असते. तेव्हा रोगप्रतिकारक्षमता वाढवणारे उपाय करणे हाच कोरोना आणि इतर कोणत्याही रोगाशी लढण्यासाठीचा सर्वोत्तम मार्ग आहे आणि ‘अश्वगंधा’ वनस्पती शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारा उत्तम नैसर्गिक स्त्रोत आहे. आधुनिक शास्त्रात सुद्धा शक्ती मोजण्याचे एकक हे अश्वशक्ती- ‘हॉर्सपॉवर’मध्ये मोजले जाते. अशा या मनुष्य शरीरात ‘हॉर्सपॉवर’ म्हणजेच घोड्यासारखा उत्साह आणि शक्ती आणून देणार्‍या ‘अश्वगंधा’ वनस्पतीचा विविध प्रकारच्या आयुर्वेदिक शक्तिवर्धक गोळ्यांमध्ये समावेश असतो. अशी ही ‘अश्वगंधा’ वनस्पती ‘आस्कंद’ तसेच ‘विंटर चेरी’ या नावाने प्रसिद्ध असून सामान्यत: भारतात मध्य प्रदेश तसेच महाराष्ट्रात आढळून येते.
‘पितांबरी’ने ‘अश्वगंधा’ वनस्पतीवर संशोधन करुन तिच्या मुळाचा अर्क काढून त्यापासून ‘अश्वगंधा Q>°बधा’ टॅब्च्या आयुर्वेदिक शक्तिाततीब्लेट’ची निर्मिती केली आहे. त्यामुळे ‘पितांबरी अश्वगंधा टॅब्लेट’मधून ‘अश्वगंधा’ वनस्पतीची कार्यकारी तत्त्वं जशीच्या तशी आपल्याला मिळतात. वनस्पतीच्या मुळापासून शास्त्रशुद्ध पद्धतीने काढलेला अर्क हा चूर्णापेक्षा अधिक परिणामकारक असतो. म्हणूनच ‘पितांबरी’ने ‘अश्वगंधा टॅब्लेट’मध्ये ३ ग्रॅम चूर्णाऐवजी ४०० मिलीग्रॅम अर्काचा समावेश केला आहे. जो चूर्णापेक्षाही अधिक परिणामकारकता सिद्ध करणारा आहे. तसेच अर्क रक्तात लवकर शोषला जाऊन शरीरात लगेच पसरतो व त्याचा परिणाम त्वरित दिसून येतो. त्यामुळे सध्याच्या कोरोनाजन्य परिस्थितीमध्ये ‘अश्वगंधा’तून रोगप्रतिकारकशक्ती मिळवण्यासाठी काढा किंवा चूर्णाला पर्याय म्हणून ‘पितांबरी’निर्मित ‘अश्वगंधा टॅब्लेट’चे नियमितपणे सेवन करणे फायदेशीरच ठरु शकते.
आयुर्वेदात औषधांमध्ये उपयुक्त असणार्‍या वनस्पतींच्या भागाचा उल्लेख दिलेला आहे. त्याचप्रमाणे ‘अश्वगंधा’चे गुणधर्म आयुर्वेदातील ‘भावप्रकाश’, ‘चरक’ या ग्रंथात वर्णन केले आहेत. ‘अश्वगंधा’च्या मुळांमध्ये आवश्यक तेल असते. मुळांच्या रसामध्ये काळे रेझिन आणि स्निग्धाम्ले असतात. तसेच पोटॅशियम, नायट्रेट, टॅनिन, रंगद्रव्ये, ग्लूकोज आणि अल्कलॉइड ही पोषणद्रव्येही ‘अश्वगंधा’मध्ये आहेत. त्यामुळे ‘अश्वगंधा’ विषाणूनाशक, जंतुनाशक, रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी आणि रोगप्रतिबंध करणारी आहे, असेही संशोधनामध्ये आढळून आले आहे.
रोगप्रतिकारकशक्ती चांगली असेल तर कोरोना संसर्गापासून दूर राहण्यास मदत होते, असे जागतिक आरोग्य संघटना, तसेच ‘कोविड-१९’ वर संशोधन करणार्‍या वैद्यकीय तज्ज्ञांनी आधीच सांगितले आहे. त्यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती चांगली असणं अत्यंत गरजेचे आहे आणि रोगप्रतिकारकशक्ती अधिक चांगली करण्यासाठी ‘पितांबरी’च्या ‘अश्वगंधा टॅब्लेट’चा फायदा होऊ शकतो.
‘अश्वगंधा’ ही उत्कृष्ट ‘इम्युनोस्टिम्युलेटर’ आहे. ती तुमच्या रोगप्रतिरोध प्रणालीची क्षमता वाढवून संक्रमणाविरुद्ध लढण्यास मदत करते. त्यामुळे कोरोना तसेच इतर कोणत्याही रोगांनी त्रस्त झालेल्या रुग्णांचे ‘व्हायरल इन्फेक्शन’ कमी करुन त्यांच्यातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी ‘पितांबरी’च्या ‘अश्वगंधा टॅब्लेट’चा सर्वाधिक फायदा होऊ शकतो. 
‘अश्वगंधा’ वनस्पतीवर संशोधन करित असलेल्या ‘आयआयटी दिल्ली’ आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स इंडस्ट्रियल सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, जपान’ यांनी केलेल्या संशोधनानुसार ‘अश्वगंधा’ ‘कोविड-१९’ रोगावर अत्यंत फायदेशीर ठरु शकते. ‘अश्वगंधा’तील ‘एम-प्रोहे’ प्रोटीनमुळे विषाणूवरील घातक प्रोटीन आवरण विरघळण्यास मदत होते, ज्यामुळे साथीचे आजार पसरवणारा विषाणू संपूर्णपणे विरघळून नष्ट होतो आणि आपल्याला कोणताही रोगसंसर्ग होण्याचा धोका उद्भवत नाही. तसेच ‘अश्वगंधा’तील ‘विथेनॉन’ हे रसायन शरीरातील कोशिकांमध्ये (सेलमध्ये) घातक विषाणूचा प्रवेश थांबवून रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी मदत करते. ‘अश्वगंधा’च्या उपयोगाने रक्तातील ‘सीडी 3’ व ‘सीडी 4’ची संख्या वाढते. शरीरात ‘इम्युनोग्लोबिन्स’ही वाढतात. परिणामी, शरीरातील पांढर्‍या पेशी सहजपणे कार्य करु लागतात. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढू लागते आणि विषाणू संक्रमणांना सामोरे जाण्याच्या शरीराच्या क्षमतेत सुधार होतो. अशा प्रकारे ‘अश्वगंधा’च्या बिया व त्यांचे उपयोग संशोधनाने सिद्ध झाल्याने शासनाकडूनही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे संशोधन केले जाणार आहे, त्यात ‘अश्वगंधा’ व इतर औषधे यांचा तुलनात्मक अभ्यासही केला जाणार आहे. एका संशोधनानुसार, कोरोनाला कारणीभूत असलेल्या ‘कोविड-१९’चे पुनरुत्पादन ‘अश्वगंधा’त असलेल्या ‘विथेनॉन’मुळे रोखले जाते, असेही दिसून आले आहे.
 
 

a_1  H x W: 0 x 
 
 
‘अश्वगंधा’ चवीला रसाने कडू-तुरट आणि थोडीशी तिखट अशी आहे, तर वीर्याने उष्ण आणि विपाकाने मधुर म्हणजेच गोड आहे. रसाने आणि विपाकाने वात आणि कफदोषशामक आहे. त्यामुळे ‘पितांबरी’च्या ‘अश्वगंधा टॅब्लेट’चे सेवन केल्यास कफदोषाचा नाश होतो. विशेषत: ज्यात कफदोषाचे प्राधान्य आहे- अशा श्वास, दमा, सर्दी-खोकल्याच्या व्याधी लवकर बर्‍या करण्यातही ‘पितांबरी’ची ‘अश्वगंधा टॅब्लेट’ उपयोगी पडते. कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सगळ्यांच्याच शारीरिक, आर्थिक, मानसिक स्थितीवर विपरीत परिणाम होऊन चिंता, भीती, अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे सध्या नैराश्याचे प्रमाणही वाढत आहे. अशात मानसिक तणाव कमी करण्यासाठीदेखील ‘पितांबरी’ची ‘अश्वगंधा टॅब्लेट’ परिणामकारक ठरते. ‘अश्वगंधा’तील ‘अ‍ॅडाप्टोजीन्स’ हा पोषक घटक माणसाला आलेला तणाव, थकवा आणि चिंता यामुळे होणार्‍या दुष्परिणामावर प्रभावी ठरतो. ‘अश्वगंधा’च्या वापराने शरीरातील स्नायू, जननेंद्रियांना विशेष बळ मिळते. यातून मेंदूलाही विशेष बल्य प्राप्त होऊन मेंदूची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे नैराश्य दूर होऊन मन प्रसन्न राहण्यास मदत होते. ‘अश्वगंधा’ निद्राकारक असल्याने झोपही चांगली लागते. चयापचय क्रिया नियंत्रणात ठेवण्यासही ‘अश्वगंधा’ उपयुक्त ठरते. ‘पितांबरी अश्वगंधा टॅब्लेट’ नियमित घेतल्यास शरीरातील स्नायूंवरील ताण कमी होतो व हृदय सशक्त राहण्यास मदत होते.
याशिवाय शुक्रवर्धक, रक्तातील शर्करा नियंत्रित ठेवण्यासाठी, वातशमन, वातरक्त, आमवात, हिवताप, साधा ताप, कृमिनाशक, गर्भधारणा, स्नायूंना बलदायक, मूत्राशयाचे विकार, लैंगिक आरोग्यासाठी, तेजस्वी अंगकांतीसाठी तसेच वृद्धावस्था लवकर येऊ नये याकरिता ‘अश्वगंधा’ अतिशय उपयुक्त आहे. 
अशाप्रकारे बहुगुणी व बहुउपयोगी असलेल्या ‘अश्वगंधा’ औषधाच्या सेवनाचे कोणतेच दुष्परिणाम होत नाहीत. त्यामुळे कोरोनाबरोबरच इतर कोणत्याही आजारांपासून दूर राहण्यासाठी ‘पितांबरी’च्या ‘अश्वगंधा टॅब्लेट’चा उपयोग करुन आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढवा आणि निरोगी जीवन जगा.
‘पितांबरी’ची ‘अश्वगंधा टॅब्लेट’ सकाळी व संध्याकाळी (खाल्ल्यानंतर) अशी दिवसातून दोन वेळा कोमट पाण्यासोबत घ्यावी. सर्व वयोगटातल्या व्यक्तींसाठी अतिशय उपयुक्त असलेल्या ‘पितांबरी अश्वगंधा’ची ६० टॅब्लेट्ची एक बॉटल १४२ रुपयांना सर्व केमिस्टमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

 
- डॉ. जीवन प्रकाश चौधरी
 
@@AUTHORINFO_V1@@