कोरोना कहर (भाग-१६)- ‘चायना आर्स’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jul-2020
Total Views |


Chinese_1  H x


तापात रुग्णाचे हात-पाय बर्फासारखे थंडगार पड़तात. रुग्णाला झोप लागत नाही व मधूनमधून दम लागू लागतो. तापामध्ये रुग्णाला खूप घाम येतो. त्यामुळे रुग्ण खूप थकून जातो. सतत आम्लपित्ताचा त्रास होऊ लागतो. छातीत थडथडायला लागते. (Palpitations ) या आणि अशा प्रकारची जर लक्षणे रुग्णामध्ये आढळली तर ‘चायना आर्स’ हे औषध तो आजार मुळापासून बरे करते.


कुठल्याही रुग्णामध्ये दिसून येणार्‍या लक्षणांवरून, चिन्हांवरून आपल्याला त्या आजाराचा टप्पा लक्षात येत असतो. त्या टप्प्यावरून वा पातळीवरून (Stage of Disease) मग आपल्याला त्याप्रकारचे औषध निवडावे लागते. तेव्हा ‘कोविड- १९’सारख्या साथीच्या आजाराचा प्रश्न येतो, त्यावेळेस आजाराची पातळी पाहूनच तत्परतेने उपचार करावे लागतात. आज आपण अशाच एका औषधाची माहिती घेणार आहोत. जे औषध ‘कोविड-१९’च्या पुढच्या पातळीवरील रुग्णाला फार उपयुक्त ठरू शकते व ते औषध म्हणजे ‘चायना आर्स’ (China Arsenicum). आपण आता या ‘चायना आर्स’ या औषधाची लक्षणे थोडक्यात पाहूया. अशी तंतोतंत लक्षणे जर आपल्याला रोग्यामध्ये आढळली, तर या औषधाने त्या रोग्याचा कुठलाही आजार बरा होऊ शकतो. अशक्तपणा, प्रचंड प्रमाणात येणारा थकवा व कुठलेही काम न करता येण्याची हतबलता, कंटाळवाणेपणा आणि अतिप्रमाणात मानसिक जडत्व व मानसिक थकवा हे या औषधाचे मुख्य गुणधर्म आहेत. तापामध्ये रुग्णाला इतका थकवा येतो की, तो जागेवरून उठूच शकत नाही. अचानक चक्कर येऊ लागते, गरगरते, वर पाहिले की गरगरायला लागते.


रुग्णाला खालील गोष्टींनी त्रास होतो. जसे-


आराम करताना रुग्णाला त्रास होतो. उपाशी पोटी रुग्णाला फार त्रास होतो. जर रुग्ण फिरत असेल, चालत असेल तर त्यास बरे वाटते. रुग्णास उबदार व गरम खोलीत राहायला आवडते. गरम खाणे व गरम पेये पिण्यास आवडतात. वेदना सहन करण्याची शक्ती अतिशय कमी असते. बरीचशी लक्षणे- उदा. ताप रात्री किंवा झोपेत असताना सुरू होतो. नाडी अतिशय जलद, अशक्त आणि अनियमित लागते. आजारात रुग्ण अतिशय चिडचिडा होतो. त्याला कुठलेही प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. रागात तो बोलायचे टाळतो. सतत भयग्रस्त असतो. सकाळ-संध्याकाळ त्यात भीती वाटत राहते व सायंकाळी भीतीचे प्रमाण वाढते. तापामध्ये रुग्ण भयंकर घाबरतो. जवळच्या लोकांशी व मित्रांशी उगाचच तिरकस वागतो. भित्रेपणा, चिडचिडेपणा, उतावळेपणा, अस्वस्थता ही मुख्य लक्षणे होत. तापात तर रुग्ण अतिशय निराश होतो, घाबरतो. आजारातून व तापातून बरे होऊ की नाही, या विचाराने त्याला नैराश्य येते. रुग्णाला भूक लागत नाही. खाण्यात अंडी व मासे आल्यास त्याला ते पचत नाहीत व अतिसार होतो. त्यानंतर प्रचंड थकवा जाणवतो. ताप चढतो व उतरतो. मधूनमधून रुग्णाला खूप थंडी वाजून थरथरायला होते. गरम व उबदार जागी रुग्णाला बरे वाटते.


तापात रुग्णाचे हात-पाय बर्फासारखे थंडगार पड़तात. रुग्णाला झोप लागत नाही व मधूनमधून दम लागू लागतो. तापामध्ये रुग्णाला खूप घाम येतो. त्यामुळे रुग्ण खूप थकून जातो. सतत आम्लपित्ताचा त्रास होऊ लागतो. छातीत थडथडायला लागते. (Palpitations) या आणि अशा प्रकारची जर लक्षणे रुग्णामध्ये आढळली तर ‘चायना आर्स’ हे औषध तो आजार मुळापासून बरे करते. ‘कोविड-१९’च्या तापात हे औषधही अतिशय उपयुक्त असे औषध आहे. होमियोपॅथीक तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय व त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय अशी औषधे घेणे धोकादायक असते. तेव्हा कृपया स्वतःच याचे प्रयोग करू नयेत. पुढील भागात ‘कोविड-१९’च्या उपचारांबद्दल आपण अजून माहिती पाहू.
 
 

- डॉ. मंदार पाटकर

@@AUTHORINFO_V1@@