लव्ह जिहाद : बौद्धांच्या मुळावर घाव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jul-2020
Total Views |


Agralekh_1  H x

 



लडाखमध्ये मुस्लीम तरुणांकडून बौद्ध मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्या धर्मांतराचा प्रकार सुरु असल्याचा दावा ‘लडाख बुद्धिस्ट असोसिएशनने केला आहे. लडाखमधील बौद्धांच्या मुळावर उठलेला ‘लव्ह जिहाद’चा प्रकार थांबला नाही, तर इथे बौद्धांचे नामोनिशाण शिल्लक राहणार नाही, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.

 



कोणत्याही समुदायाला प्रथा-परंपरा, संस्कृती, वारसा आणि स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल तर शांत बसून चालत नाही. आपल्यावर कोणत्याही प्रकारे आक्रमण करणार्‍याचा संपूर्ण शक्तीनिशी सामना करावा लागतो, अन्यथा काळाच्या ओघात तो समुदाय नष्ट होऊन जातो. काहीशी अशीच अवस्था लडाखमधील बौद्ध समुदायाची झाली असून त्याला कारण ठरले ते इस्लामानुयांकडून सुरु असलेल्या लव्ह जिहादचे लडाख बुद्धिस्ट असोसिएशनने (एलबीए) मुस्लीम तरुणांकडून बौद्ध मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून नंतर त्यांचे धर्मांतर करण्याच्या प्रकारावर चिंता व्यक्त केली आहे. तसेच ‘आम्हाला न्याय मिळाला नाही, तर देशातून बौद्धांचा खात्मा होईल आणि लडाखमध्येही बौद्ध शिल्लक राहणार नाहीत,’ असे ‘एलबीए’ने म्हटले. लडाखमध्ये मुस्लीम तरुण आपण बौद्ध असल्याचे सांगून सुरुवातीला मुलींशी मैत्री करतात, पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात होते आणि नंतर विवाह होतो, असे ‘लडाख बुद्धिस्ट असोसिएशन’ने सांगितले. मात्र, काही काळानंतर आपण ज्याच्याशी लग्न केले तो तरुण बौद्ध नसून मुस्लीम असल्याचे त्या मुलीला समजते आणि तिची फरफट सुरु होते, असे म्हणत ‘एलबीए’ने, फसवाफसवीच्या साहाय्याने विवाह करुन घरी आणलेल्या बौद्ध मुलीवर इस्लामी रीतिरिवाज पाळण्याची आणि धर्मांतर करण्याची बळजबरी केली जाते, असा दावाही केला. पुढे धर्मांतरातून होणारी संततीदेखील मुस्लीम म्हणूनच जन्म घेते, यातूनच बौद्धांमधली एक व्यक्ती कमी होते, तर मुस्लिमांमध्ये लग्न करुन आणलेल्या एका मुलीची व त्यानंतर जन्म घेणार्‍या एक वा चार किंवा अनेक मुलांची भर पडत राहते. लडाख बुद्धिस्ट असोसिएशनने म्हणूनच यावर आक्षेप घेतला असून बौद्धांच्या मुळावर उठलेल्या ‘लव्ह जिहाद’ प्रकारात सरकारने लक्ष घालावे, असे आवाहन केले आहे, तर स्थानिक प्रशासन मात्र बौद्ध मुलींच्या अशाप्रकारे मैत्री, प्रेम, विवाह व धर्मांतराकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही ‘एलबीए’ने केला.

 


लडाखची एकूण लोकसंख्या साधारणतः २ लाख, ७४ हजार इतकी असून इथे ४९ टक्के मुस्लीम आहेत, तर ५१ टक्के बौद्ध. इथे १९८९ साली बौद्ध आणि मुस्लिमांमध्ये हिंसक दंगलीही उसळल्या होत्या. हिंसाचारानंतर ‘लडाख बुद्धिस्ट असोसिएशन’ने मुस्लिमांवर सामाजिक व आर्थिक बहिष्काराचे आवाहन केले होते. मुस्लिमांवरील हा बहिष्कार १९९२ सालापर्यंत सुरु राहिला व नंतर मागे घेण्यात आला. आता मात्र पुन्हा एकदा इथे बौद्ध मुलींना मुस्लिमांकडून लक्ष्य केले जात असून त्याचे पर्यावसन कशात होईल, हे सध्यातरी सांगता येणार नाही. कारण, गौतम बुद्धांच्या शांती आणि अहिंसेचे तत्त्वज्ञान आचरणारा बौद्ध समुदाय आपले अस्तित्व राखण्यासाठी हा मार्गही सोडू शकतो. म्यानमार आणि श्रीलंकेत इस्लामी कट्टरतावाद्यांविरोधात तिथल्या बौद्धांनी आक्रमक पवित्रा घेतल्याची उदाहरणे आपल्या समोर आहेतच. त्यामुळे लडाखमधील बौद्धांनी आपल्या धर्म व मुली-महिलांच्या बचावासाठी उग्रवादाचा आधार घेतला तर आश्चर्य वाटणार नाही, मात्र त्याआधी सरकार व प्रशासनाने या प्रकारात लक्ष घातले तर उत्तम!

 


दरम्यान, लडाखमध्ये ‘लव्ह जिहादच्या माध्यमातून बौद्ध मुलींना मुस्लीम करण्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा आरोपही करण्यात येतो. आपल्याला माहितीच आहे की, मुस्लीम बहुसंख्येमुळे जम्मू-काश्मीरवर आमचाच अधिकार असल्याचे तुणतुणे पाकिस्तान सारखे वाजवत असतो. मुस्लिमांच्या हक्कांसाठी आपण लढत असल्याचेही त्याला यातून जगासमोर किंवा मुस्लीम देशांसमोर तरी सांगता येते. पण, लडाखमध्ये मुस्लीम व बौद्धांच्या लोकसंख्येत दोन टक्क्यांचाच फरक आहे. हे अंतर कमी करण्याचा एक मार्ग म्हणजे ‘लव्ह जिहाद,’ असे पाकिस्तानला वाटते. त्यासाठीच पाकिस्तानकडून मुस्लीम तरुणांना ‘लव्ह जिहाद’साठी प्रोत्साहन दिले जाते आणि बौद्ध मुलींच्या धर्मांतराच्या कारवाया चालतात. जेणेकरुन एक वेळ अशी येईल की, बौद्धांच्या मुली धर्मांतरित होऊन मुस्लीम झाल्या की, आपोआप मुस्लिमांची लोकसंख्या तिथे वाढेल व पाकिस्तानला लडाखवरचा दावा अधिक प्रभावीपणे सांगता येईल! इथे ‘लव्ह जिहाद’चे मूळ कशात आहे, हेही समजून घेतले पाहिजे. इस्लामी विचारधारेनुसार जगाची विभागणी ‘मोमिन’ आणि ‘काफिर’ या दोन समुदायात करण्यात आलेली आहे. अल्लाहला मानणारे ‘मोमिन’ आणि त्याला न मानणारे सर्व लोक ‘काफिर!’ काफिरांची खोटी पूजापद्धती नष्ट करुन तलवार, छळ, फसवणूक वा प्रलोभनाच्या जोरावर त्यांना धर्मांतरासाठी तयार करणे वा ते तयार नसतील तर त्यांना मारुन टाकावे आणि हे करताना स्वतःचा जीव गेला तरी बेहत्तर, असे कट्टर व धर्मांध इस्लामी तत्त्वानुसार सांगितले जाते. भारतावर मोहम्मद बिन कासिम, महमूद गझनी, मोहम्मद घोरी, तैमूरलंग, बाबर, अल्लाउद्दीन खिलजी यांसारख्यांनी अशा कट्टर व धर्मांध विचारानेच आक्रमणे केली. जगात आज जे 56 इस्लामी देश दिसतात, ते अशाप्रकारच्या आक्रमणांतूनच निर्माण झाले असून तिथल्या मूळ धर्म, संस्कृती व वारशाचे यामुळे नामोनिशाण मिटल्याचे दिसते. मात्र, आताच्या काळात हत्याराच्या जोरावर सरसकट एखाद्या समुदायावर हल्ला करणे शक्य नाही, त्यामुळे आपले मूळ उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ‘लव्ह जिहाद’ नावाचा प्रकार कट्टर इस्लामी व्यक्ती, संस्था व संघटनांकडून चालवला जातो.

 


पाकिस्तानसह केरळ, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश, तेलंगण राज्यात ‘लव्ह जिहाद’ची अनेक प्रकरणे आतापर्यंत उघडकीस आलेली आहेत. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियासारख्या कट्टर व धर्मांध संघटनांचा यात सहभाग असल्याचेही म्हटले जाते. सर्वोच्च न्यायालयानेदेखील लव्ह जिहाद’च्या एका प्रकरणाच्या राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात ‘एनआयए’मार्फत चौकशीचे आदेश दिले होते व ‘एनआयए’ला ‘लव्ह जिहाद’च्या आरोपांत तथ्य असल्याचे आढळले होते. लडाखमध्येही ‘लव्ह जिहाद’चा उद्योग सुरु असून २००३ सालापासून इथे आतापर्यंत १०० पेक्षा अधिक बौद्ध मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या सापळ्यात अडकवले गेले. मात्र, त्याविरोधात आवाज उठवला की, दरवेळी संबंधित मुलींनी स्वेच्छेने धर्मांतर केल्याचे सांगण्यात येते. तसेच ‘लव्ह जिहाद’चा मुद्दा आला की, धर्मनिरपेक्षतावादी व उदारमतवादी राजकीय पक्ष तथाकथित अल्पसंख्यकांची बाजू घेण्यासाठी पुढे येतात व हिंदू, ख्रिश्चन किंवा बौद्धांना विचारतही नाहीत. ‘लडाख बुद्धिस्ट असोसिएशनने प्रशासन व राजकीय पक्षांकडून दखल न घेण्यातून ‘लव्ह जिहाद’ असाच सुरु राहिला, तर बौद्ध समुदाय संपेल, अशी काळजी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत लडाखचे ‘लडाखपण’ टिकवण्यासाठी केंद्र सरकारनेच पुढाकार घ्यायला हवा, जेणेकरुन तिथले बौद्ध अन्य कोणता मार्ग स्वीकारणार नाहीत किंवा ‘लव्ह जिहाद’मुळे संपणार नाहीत.

 

 
@@AUTHORINFO_V1@@