कल्याण डोंबिवलीतील कोरोना परिस्थितीची गंबीर ; राज्य सरकारने दखल घ्यावी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jul-2020
Total Views |

KDMC_1  H x W:



कल्याण : 
कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती तसेच प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज कल्याण मधील हॉली क्रॉस हॉस्पिटलला भेट देत पालिकेकडून सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. कल्याण डोंबिवली मधील कोरोनाची परिस्थिती गंभीर बनत असल्याने राज्य सरकाने याची तातडीने दखल घेणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.


शहरातील रुग्णसंख्या ज्या वेगाने वाढत आहे त्यामुळे सुविधा कमी पडत असून आयसीयूसह आयसोलेशनची सुविधा वाढविणे गरजेचे आहे. मात्र यासाठी राज्य शासनाकडून तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करीन देणे गरजेचे आहे. एकीकडे सोयीसुविधा कमी पडत असताना आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता हा मुद्दा देखील महत्वाचा असून इतर ठिकाणाहून आरोग्य कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात उपलबंध करून घ्यावेत. नव्याने भरती करावी, स्वॅब टेस्टिंगचा अहवाल येण्यास होत असलेला विलंब घातक असून २४ तासात अहवाल मिळावा यासाठी नियोजन होणे गरजेचे आहे. म्हणूनच राज्य सरकारने यात तातडीने लक्ष घालावे अशी आमची मागणी असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


सध्याची स्थिती क्रिटीकल असून त्यासाठी आपली पूर्ण क्षमता राबवावी लागेल, जसे टेस्टिंग वाढेल तसे रुग्णांसाठी इन्फ्रास्ट्रक्चरही असणे आवश्यक आहे असे ते पुढे म्हणाले. एम.एम.आर रिजनमधील परिस्थिती जाणून घेण्यासाठी हा दौरा केल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. हॉलीक्रॉस रुग्णालयाने चांगल्या प्रकारे काम केले असून 'कोविड योध्यांना माझा सलाम' अशा शब्दात त्यांनी हॉलीक्रॉसच्या कर्मचारी वर्गाची प्रशंसा केली. या बैठकीस विधानपरिषद विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर, आमदार रविंद्र चव्हाण, गणपत गायकवाड, निरंजन डावखरे, माजी आमदार नरेंद्र पवार, पोलीस उपायुक्त विवेक पानसरे तसेच महापालिका अधिकारी वर्ग उपस्थित होता.यावेळी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपायोजनाबाबत माहिती दिली.
@@AUTHORINFO_V1@@