ऑनलाईन जुगारु अॅपचे व्यसन लावतायत विराट आणि तमन्ना !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2020
Total Views |

MHC_1  H x W: 0
 
मद्रास : लॉकडाऊनच्या काळामध्ये भारतीय कर्णधार विराट कोहली घरात असूनसुद्धा असतानाही त्याच्याविरोधात मद्रास उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली. चेन्नईमधील एका वकिलाने न्यायालयात याचिका करताना म्हणले आहे की, “विराट कोहली आणि तमन्ना भाटीया हे दोघेही जनतेची दिशाभूल करत असून या अॅपमुळे लोकांना व्यसन लागत आहे. त्यामुळे अशा अॅपची जाहिरात केल्याबद्दल त्यांना अटक करावी आणि या अॅपवर बंदी आणावी.” अशी मागणी केली आहे.
 
नेमके काय आहे प्रकरण ?
 
लॉकडाऊनदरम्यान एका मोबाईल अॅपची जाहिरात प्रसिद्ध होत आहे. यामध्ये अनेक ऑनलाईन गेम्स खेळून पैसे कमवता येतात, अशी जाहिरात करण्यात येत आहे. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री तमन्ना भाटीया या ऑनलाईन मोबाईल गेम अॅपची जाहिरात करत आहेत.
 
याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे तरी काय?
 
याचिकाकर्ते वकिलांनी सांगितले की, “विराटने ऑनलाईन जुगाराच्या अॅपची जाहिरात केली. या जाहिरातीमध्ये कोहलीने लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. या अॅपमध्ये जुगार खेळण्यासाठी एका मुलाने उसणे पैसे घेतले होते. या पैशांची परतफेड करता न आल्यामुळे त्या मुलाने आत्महत्या केली.” या गोष्टीचा अहवालही या याचिकेमध्ये देण्यात आला आहे. मद्रास उच्च न्यायालयामध्ये केलेल्या याचिकेमध्ये म्हंटले आहे की, लोकांमध्ये ऑनलाईन जुगाराचे व्यसन वाढत चालले आहे. त्यामुळे या अॅपवर बंदी आणायला हवी. तसेच, लोकांची दिशाभूल करणाऱ्या विराट आणि तमन्ना या दोघांनाही अटक करावी. अशा ऑनलाईन जुगारामध्ये आतापर्यंत बरेच युवक दिवाळखोरीत निघाले आहेत. यासाठी अशा अॅप्सवर बंदी आणावी अशी मागणी केली आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@