‘या’ अभिनेत्याला केली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मदत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2020
Total Views |

Yogi Adityanath_1 &n
 
नवी दिल्ली : हिंदी मालिका क्षेत्रातील दिग्गज अभिनेते अनुपम श्याम ओझा हे किडनीच्या आजाराशी लढत आहेत. त्यांच्यासाठी आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुढाकार घातला आहे. मुंबईतील लाईफलाईन रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या ओझांना कुठीलीही गोष्ट कमी पडू नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. अनुपम श्याम ओझा हे मुळचे प्रतापगडचे असून गेले अनेक वर्ष ते टीव्ही मालिकांमध्ये काम करत आहेत.
 
 
 
अभिनेते अनुपम श्याम ओझा हे गेले वर्षभर किडनी आजाराशी झुंज देत आहेत. त्यांना किडनी ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. परंतु, आर्थिक तंगीमुळे त्यांच्या उपचारामध्ये अडथळे येत होते. सोशल मिडीयावर याबाबत माहिती येताच त्यांना मदत व्हावी यासाठी एकमोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला साथ देत अभिनेता सोनू सूद, मनोज वाजपेयी यांनीदेखील मदतीचा हात पुढे केला आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मदतीचे सोशल मिडीयावर कौतुक होत आहे.
@@AUTHORINFO_V1@@