'लवासाचे रुपांतर कोविड सेंटरमध्ये करा'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2020
Total Views |
ते 
girish bapat_1  



पुणे :
लवासामध्ये कोविड सेंटर उभारावे अशी मागणी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील कोरोना परिस्थिती हाताळण्यावरून राज्यसरकारने केलेल्या दुर्लक्ष्यावरून महापालिकेतील सत्ताधारी व राज्यातील विरोधी पक्ष भाजप मुख्यमंत्र्यांना घेरण्याची तयारीत आहे.



मुळशी तालुक्यातील नागरिकांना तपासणीसाठी पुण्यात यावे लागते. यामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांचा देखील समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन शाळा, खासगी रुग्णालये व हॉटेल ताब्यात घेत आहे. ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन खासदार बापट यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले असून लवासा ताब्यात घेण्याची सूचना केली आहे. लवासामध्ये सर्व प्रकारच्या सोयीसुविधांनी सज्ज असलेल्या अनेक इमारती आहेत. त्या वापराविना पडून आहेत. ज्या तालुक्यात लवासा वसले आहे त्या मुळशी तालुक्यातही करोनाचे रुग्ण वाढत आहेत.

'लवासामध्ये लोकवस्ती फारच कमी आहे. त्यामुळे क्वारंटाइन सेंटरसाठी ही जागा योग्य आहे. अनेक रिकाम्या इमारतींबरोबरच लवासामध्ये एक अद्ययावर रुग्णालय देखील तयार आहे. त्यामुळे वैद्यकीय सुविधांवर वेगळा खर्च करण्याची गरज लागणार नाही. मुळशी तालुक्यातील करोनाबाधितांना तिथं शिफ्ट करता येईल,' असेही बापट म्हणाले. याबाबत आज मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुण्याचा दौरा करणार आहेत. राज्यावर कोरोनाचे संकट असूनही मुख्यमंत्री मातोश्रीचा उंबरठा ओलांडत नसल्याची टीका विरोधकांकडून वारंवार होत आहे. शिवाय पुण्यावर अन्याय होत असल्याची टीकाही विरोधक करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा महत्त्वाचा समजला जात आहे. मुख्यमंत्री आज दिवसभर पुण्यात असतील. यावेळी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसोबत कोरोनाविषयक बैठकाही घेणार आहेत.
 


 
@@AUTHORINFO_V1@@