मुंबई पोलिस नव्हे, महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले : राम कदम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2020
Total Views |

ram kadam_1  H




मुंबई :
सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येच्या तपासावरून आता राजकारण तापू लागले आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी त्याच्या कुटुंबाचे वकील विकास सिंह यांनी मुंबई पोलिसांवर आरोप केला आहे. तर दुसरीकडे सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे सोपवणार नाही असा पवित्राच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतलं आहे.यावरून भारतीय जनता पक्षाने प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजप नेते राम कदम यांनी राज्यसरकावर टीकास्त्र सोडत सुशांतसिंगच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे सोपवून जनतेचा आदर राखावा अशी मागणी केली आहे.



ते म्हणतात, "महाराष्ट्र सरकारने जर मुंबई पोलिसांना मोकळेपणाने काम करू दिलं असतं त्यांच्या कामात हस्तक्षेप केला नसता तर आज जी देशभरातून लोकांची मागणी होत आहे सुशांतसिंग प्रकरण सीबीआय कडे सोपवावं ही मागणी झाली नसती. संपूर्ण देशभरातून सुशांत सिंगच्या आत्महत्येच्या तपास सीबीआयकडून व्हावा ही मागणी मुंबई पोलिसांचे अपयश नाही तर ते अपयश महाराष्ट्र सरकारचे आहे. हे सरकराने मान्य करावे." पुढे ते म्हणाले, "मुंबई पोलिसांना सरकारने मोकळेपणाने काम करू द्यावे. सरकारने खोट्या अभिमानापोटी देशभरातून होत असलेल्या मागणीचा अनादर करणार की केराची टोपली दाखवणार हे आता आम्हाला बघायचं आहे."
@@AUTHORINFO_V1@@