'नातीनं आजीचं नाक कापलं' ; परेश रावल यांचे प्रियांका गांधींवर टीकास्त्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2020
Total Views |

paresh rawal _1 &nbs



नवी दिल्ली :
काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी – वाड्रा यांना त्यांचा दिल्लीतील लोधी इस्टेट परिसरातील सरकारी बंगला १ ऑगस्ट, २०२० पर्यंत रिकामा करण्याची नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यानंतर आता प्रियंका गांधी सरकारी बंगला सोडून खासगी निवासस्थानी जाणार आहेत. याच दरम्यान बंगल्यावरून बॉलिवूड अभिनेते आणि भाजपा नेते परेश रावल यांनी प्रियांका गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी यासंबंधीत ट्विट केले आहे. "मोफत मिळालेल्या बंगल्यात राहून नातीने आजीचे नाक कापले" असे म्हणत परेश रावल यांनी प्रियांका गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. विशेष रक्षण गटाचे (एसपीजी) संरक्षण काढून घेण्यात आल्याच्या आधारे त्यांना सरकारी बंगला सोडण्यास सांगण्यात आल्याचे नोटिशीत म्हटले आहे.



गृहमंत्रालयाने मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रियांका गांधी यांचे एसपीजी संरक्षण काढून घेतले होते. १९९७मध्ये एसजीपी संरक्षणामुळे त्यांना ३५ लोधी एस्टेट स्थित सरकारी बंगला देण्यात आला होता. मात्र, आता सदर बंगला महिन्याभरात म्हणजे १ ऑगस्ट, २०२० पर्यंत रिकामा करण्याची नोटीस त्यांना बजाविण्यात आली आहे. तसे न केल्यास त्यानंतरच्या कालावधीसाठी भाडे अथवा दंड भरावा लागेल, असेही नोटीशीत नमूद करण्यात आले आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी – वाड्रा यांची एसपीजी सुरक्षा काढून केंद्रीय राखीव पोलिसांचा समावेश असलेली झेड प्लस सुरक्षा त्यांना पुरवण्यात आली आहे. त्याअंतर्गत सरकारी निवासस्थानाची तरतूद नाही. त्यामुळे महिन्याभरात प्रियांकांना बंगला सोडावा लागणार आहे.


@@AUTHORINFO_V1@@