बॉलीवूडच्या लाडक्या नृत्यदिग्दर्शिका काळाच्या पडद्या आड!

    03-Jul-2020
Total Views |

Saroj Khan_1  H



सरोज खान यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन


मुंबई : बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शका सरोज खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुंबईच्या वांद्र्यातील गुरुनानक रुग्णालयात त्यांनी वयाच्या ७१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सरोज खान यांची कोरोना चाचणीही करण्यात आली होती. ती निगेटिव्ह आली होती. मात्र गुरुवारी मध्यरात्री त्यांना अत्यवस्थ वाटू लागले आणि उपचार सुरु असताना रात्री दोनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.


श्वास घेण्यास त्रास होत असल्याने सरोज खान यांना २० जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही झाल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात येत होते. परंतु मध्यरात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामुळे त्यांचे निधन झाले. चारकोप इथल्या कब्रस्तानमध्ये आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.