मोदींची सीमेवर उपस्थिती वाढवणार सैनिकांचे मनोबल आणि चीनची चिंता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2020
Total Views |
pm modi in leh_1 &nb






नवी दिल्ली
: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अचानक लेहमध्ये दौरा केला. हा दौरा तिथे असणाऱ्या भारतीय सैन्य आणि आयटीबीपी जवान आणि अधिकाऱ्यांसाठी महत्वाचा ठरणार आहे, असे मत निवृत्त सैन्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. निवृत्त लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांनी 'दैनिक भास्कर'ला दिलेल्या प्रतिक्रीयेत या दौऱ्याचे महत्व अधोरेखित केले आहे. 


पंतप्रधान मोदी लेहमध्ये पोहोचले आहेत. याचा केवळ सैन्यावरच नव्हे तर संपूर्ण देशावर सकारात्मक परिणाम होईल. पंतप्रधान स्वतःच घटनास्थळी पोहचून परिस्थितीचा आढावा घेतील तेव्हा पुढील निर्णय घेणे सोपे जाईल. अन्यथा परिस्थिचा आढावा घेत असताना मिळणारी माहिती द्वितीय व तृतीय स्त्रोताकडून मिळत असतेल. यामध्ये बऱाच वेळ जातो आणि युद्धभूमीवरील हालचाली वेगाने बदलत असतात. मोदी थेट घटनास्थळी दाखल झाल्याने यापुढील निर्णय थेट घेता येतील. 


सैनिकांचे म्हणणे स्वतः ऐकून घेणे हे खास गोष्ट आहे. यामुळे घटनास्थळावरील बारकावे लक्षात येतात. काही छोटेमोठे निर्णय त्यावेळीच होतात. जर मोदींनी थेट सीमेवरच आदेश दिले तर क्रिया आणि प्रतिक्रीया थेट होईल. यात कुठल्याही प्रकारचा निर्णय हा मंत्रालयापर्यंत येत नाही.


ज्यावेळी लेफ्टनंट दुवा हे काश्मीरमध्ये कमांडर होते, त्यावेळी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर तिथे पोहोचले होते. तिथल्या आढावा 
बैठकीनंतरच सर्जिकल स्ट्राईक झाला होता. पुढील १० दिवसांतच अॅक्शन घेण्यात आली होती. मोदींचे तिथे पोहोचणे यामुळे जगाला एक संदेश जाणार आहे. पंतप्रधान हे तिथल्या कमांडर सोबत आहेत. त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचे स्वतंत्र असणार आहे, असे मत निवृत्त अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.


पंतप्रधानांच्या तिथे पोहोचण्याने सैनिकांचा उत्साह दुप्पट होणार आहे. देश तुमच्या सोबत कायम आहे, असे सांगणारी ही कृती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिथल्या कमांडर आणि अधिकाऱ्यांशी थेट चर्चा केली याचा अर्थ यापुढील काळात कुठल्याही प्रकारची घटना घडली तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्याचे स्वतंत्र्य सैन्याला आहे.


मोदींचे घटनास्थळी असणे विविध पैलूंनी यापुढे पाहिले जाईल. ऑनग्राउंड ऑपरेशनमध्ये काय होईल याबद्दल कुणीही आत्ताच तर्क लावणे शक्य नाही. परंतू ज्या प्रकारे यापूर्वी आपल्या शत्रूंना आपण तोडीसतोड उत्तर दिले आहे, त्यावरून पुढील रणनितीचा अंदाज लावू शकतो. सैनिकांचे देशासाठी हुतात्मा होणे ही वेगळी गोष्ट आहे आणि त्यांच्या हौतात्माला वेगळी ओळख देणे ही दुसरी गोष्ट आहे. 


मोदींच्या या दौऱ्यामुळे चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना एक थेट संदेश जाणार आहे. आम्ही आमच्या सुरक्षिततेबद्दल थोडीशीही तडजोड करू शकणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी दिवाळीला काश्मीर आणि लडाख सीमेवर जाऊन जवानांचे शौर्य वाढवले आहे.







@@AUTHORINFO_V1@@