मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी पालिकेचा अ‍ॅप!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2020
Total Views |

disaster managment_1 



आपत्कालीन स्थितीत अडकल्यास घाबरू नका; संकटात सापडल्यास नातेवाईक, मित्रांनाही कळणार!


मुंबई : पावसाळ्यात मुंबईत पूरस्थिती निर्माण झाली आणि कोणी संकटात अडकला, तर घाबरण्याचे कारण नाही. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी पालिका प्रशासनाने अ‍ॅप तयार केला असून आपल्या परिसरात किती पाऊस पडला याची नोंद कळणार आहे. अ‍ॅप क्लिक करताच अडकलेल्या व्यक्तीचे लोकेशन आपत्कालीन नियंत्रण कक्षासह मित्र व नातेवाइकांना काही वेळातच कळणार आहे.


पालिकेने तयार केलेल्या अॅपच्या माध्यामातून कुठल्या भागात किती पाऊस पडला याची माहिती काही वेळात मिळणार आहे. पालिकेने मुंबईकरांसाठी ‘डिजास्टर मॅनेजमेंट एमसीजीएम’ अॅप तयार केला आहे. या अ‍ॅपवर ‘एसओएस’ ही वैशिष्ट्यपूर्ण सुविधा सुरु केली असून संकटात अडकल्याचे कळताच मदतीसाठी तातडीने मदत करणे शक्य होईल, अशी माहिती पालिकेचे सह आयुक्त मिलिंद सावंत यांनी दिली.


पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने आपली आपत्कालीन यंत्रणा २४ तास कार्यरत ठेवली असताना आता संकटकाळात वेगाने मदत मिळण्यासाठी सुविधा निर्माण करून दिली आहे. यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये जीपीएस यंत्रणा कार्यरत असणे गरजेचे आहे. या उपक्रमात ‘डिजास्टर मॅनेजमेंट एमसीजीएम’ हे अ‍ॅप्लिकेशन प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करावे लागेल. अँड्रॉइड व आयओएस या दोन्ही प्रकारच्या प्रणालींकरिता ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अ‍ॅपवर पालिका क्षेत्रातील पावसाळी परिस्थितीची माहिती, भौगोलिक स्थितीची माहिती, आणीबाणीप्रसंगी कुठे संपर्क साधावा याची माहिती उपलब्ध होणार आहे.


मोबाईल अ‍ॅपवरील ‘एसओएस’ या वैशिष्ट्यपूर्ण सुविधेवर आपले जवळचे नातेवाईक, मित्र यांचे मोबाईल क्रमांक तुम्ही सेव्ह करू शकणार आहात. दुर्दैवाने पावसाळ्यात कुठल्याही संकटात अडकल्यास ‘एसओएस’ सुविधेवर क्लिक केल्यास तुम्ही सेव्ह केलेल्या सर्व मोबाईल क्रमांकारवर लोकेशनसह एसएमएस जाणार आहे. या शिवाय मोबाईल अ‍ॅपवर ‘इमर्जन्सी’ या बटनावर क्लिक केल्यास संबंधित ठिकाणच्या ५०० मीटर परिसरातील रुग्णालये, अग्निशमन केंद्रे, पोलीस ठाणे, पालिका विभाग, नियंत्रण कक्षाचे संपर्क दिसणार आहे. तसेच ‘सेफ्टी टिप्स’ या सुविधेअंतर्गत २० वेगवेगळ्या आपत्तीप्रसंगी काय करावे आणि काय करू नये याचीही माहिती देणार्‍या २० अ‍ॅनिमेट फिल्मही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.


विशेष म्हणजे महत्त्वाच्या ठिकाणी पडलेल्या पावसाचे प्रमाण, भरती-ओहोटी-लाटांची उंची, पर्यायी वाहतूक व्यवस्था लोकल-विमान वाहतुकीची स्थिती याची माहितीही या मोबाईलवर पाहता येईल, असेही सावंत यांनी सांगितले.




@@AUTHORINFO_V1@@