२०११ विश्वचषक फिक्सिंग : चौकशीत सापडला नाही पुरावा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2020
Total Views |
 
icc_1  H x W: 0
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाने २०११मध्ये विश्वचषक जिंकला आणि तब्बल २८ वर्षांनंतर विश्वचषक भारताने मिळवला. परंतु, तब्बल ९ वर्षानंतर तो अंतिम सामना फिक्स असल्याचे आरोप करत श्रीलंका पोलिसांनी सर्व खेळाडूंची चौकशी केली. मात्र, त्यांना याबाबत कुठलाही पुरावा मिळाला नाही. या सर्व घटनेमुळे श्रीलंका पोलिसांना क्रिकेट चाहत्यांचा मात्र चांगलाच रोष पत्करावा लागला. गेल्या तीन-चार दिवसांपासून भारताविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यातील फिक्सिगची कसून चौकशी करणाऱ्या पोलिसांनी अखेर पुराव्या अभावी हे प्रकरण येथे थांबवत असल्याचे सांगितले.
 
नक्की काय आहे प्रकरण?
 
श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंद अलुथगमगे यांनी वानखेडे मैदानावरील भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना फिक्स झाला होता, असा आरोप केला आणि क्रीडा विश्वामध्ये एकच खळबळ माजली. त्यानंतर या आरोपाची चौकशी करण्याचे आदेश क्रीडा मंत्रालयाने दिले होते. त्यानुसार, २०११च्या निवड समितीचे प्रमुख अरविंदा डिसिल्वा, कर्णधार कुमार संगकारा, महेला जयवर्धने आणि सलामीवीर उपल तरंगा यांची अनेक तास चौकशी करण्यात आली. परंतु, यातून काहीच पुरावा सापडला नाही.
 
चाहत्यांनी धरले श्रीलंका पोलिसांना धारेवर !
 
 
गुरुवारी कुमार संगकाराची चौकशी झाली. यावेळी त्याच्या चाहत्यांनी क्रीडा मंत्रालयाच्या बाहेर निदर्शने केली होती. सरकार माजी खेळाडूंना त्रास देण्यासाठी चौकशी करत असल्याचा आरोप चाहत्यांनी केला होता. तर पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेले साजिथ प्रेमदासा यांनी सोशल मीडियावरून या चौकशीबद्दल नाराजी व्यक्त करत सरकार २०११च्या वर्ल्ड कपमधील देशाच्या हिरो कुमार संगकारासह अन्य खेळाडूंचा छळ करत असल्याचे म्हटले होते.
 
 
@@AUTHORINFO_V1@@