पवारांनी बाहेर पडा म्हटल्यावर २४ तासांत मुख्यमंत्री पुण्याच्या दौऱ्यावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jul-2020
Total Views |
Uddhav Thackeray _1 





मुंबई : लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून सतत तीन महिने 'मातोश्री'वरून कारभार चालवणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शरद पवारांनी घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला. 'लॉकडाऊन होता तेव्हा ठिक होते, आता मुख्यमंत्र्यांनी विदर्भ, कोकण, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या भागात जायला हवे, लोकांच्या मागण्या समजून घ्यायला हव्यात, त्यांना धीर द्यायला हवा', असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला. यानंतर लगेचच २४ तासांत मुख्यमंत्री पुण्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत. 




पुण्यातील कोरोनाची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. पुण्यात एकूण रुग्ण संख्या ८० हजार ३२५ इतकी झाली आहे. हा आकडा आता १ लाखांवर पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या २९ हजार ४५६ इतकी आहे. तर आत्तापर्यंत १८८५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ४८ हजार ९८४ रुग्णांवर अद्याप उपार सुरू आहेत. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे, परंतू अपेक्षेप्रमाणे यश आलेले नाही.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात लवकरच काऊन्सिल हॉल येथे सर्व प्रशासकीय अधिकारी व राजकीय नेतेमंडळी यांची बैठक होणार आहे. पुण्यातील एकूणच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहेत.




@@AUTHORINFO_V1@@