‘जीवनीयाँ’ : मानसी अत्रे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jul-2020
Total Views |
manasi atre_1  





जो जो जयाचा घेतला गुण
तो तो गुरू म्यां केला जाण


या उक्तीनुसार मानसी अत्रे यांनी अनुक्रमे गुरू किशोरीताई, ज्योत्स्नाताई, चारूताई, ज्योतीताई आणि सध्या गुरू जयंती मालाजी (कथ्थक सम्राज्ञी सीतारादेवी यांची कन्या) अशा अनेक पूजनीय गुरूंचरणी बसून चिकाटीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपली नृत्यसाधना, तपश्चर्या अविरतपणे अव्याहतपणे चालू ठेवली ती आजमितीपर्यंत. याच सिद्धतेच्या आधारावर त्यांनी कथ्थक नृत्यात अनुक्रमे कथ्थक विशारद, कथ्थक नृत्यअलंकार आणि कथ्थक नृत्यप्रभाकर या पदव्या प्राप्त केल्या आहेत आणि अधिकार वाणीने आज या क्षेत्रात मुक्तविहार करत आहेत. मानसी यांना जानेवारी २०२० मध्ये मॉरिशसच्या सांस्कृतिक मंत्रालयाने नृत्यप्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांसह आमंत्रित केले होते. तिथे त्यांचे नृत्य पाहून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच ‘लॉकडाऊन’पूर्वी त्यांना ‘मनुष्यबळ लोकसेवा अकादमी’ या रजिस्टर्ड संस्थेमार्फत कथ्थकमधील योगदानाबद्दल राज्यस्तरीय आणि राष्ट्रस्तरीय ‘कलारत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे. ज्याचे वितरण ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. मानसी यांचा अजून एक संकल्प स्वामीकृपेने पूर्ण झाला आहे. तो म्हणजे त्यांनी अनेक ठुमरी लिहिलेल्या आहेत, त्यातील काही ठुमरी संगीतबद्ध करून प्रस्तुत करण्याचा त्यांचा मानस होता. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी सगळ्या ठुमरी वाचल्या आणि एकाच नाही तर सगळ्याच ठुमरींना चाल लावून देतो, असे म्हटले आणि आता लवकरच प्रेक्षकांसाठी या ठुमरी नृत्यप्रदर्शनातून उपलब्ध होणार आहेत. मानसी यांनी १८ वर्षांपूर्वी ‘कला नृत्यकला मंदिर’ ही स्वतःची नृत्यसंस्था पती सचिन अत्रे यांच्या साथीने सुरू केली आहे. कलेचा प्रचार आणि प्रसार व्हावा, या उद्देशाने सुरू केलेल्या या वटवृक्षाच्या डोंबिवली येथे पाच, तर नेरळ येथे एक अशा एकूण सहा शाखा आहेत, जिथे मानसी स्वतः विद्यार्थ्यांना नृत्याचे धडे शिकवतात. मुलींना उत्तमोत्तम ज्ञान मिळावं यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतात. त्याप्रमाणेच मानसी यांनी सध्या सर्व ज्येष्ठ कथ्थक गुरूंच्या आशीर्वादाने पन्नासहून अधिक दिवंगत आणि वर्तमान ज्येष्ठ कथ्थक नृत्यगुरूंची माहिती एकाच व्हिडिओच्या माध्यमातून मिळावी यासाठी स्वतःचा यु-ट्यूब चॅनलवर ‘जीवनीयाँ’ नावाने एक प्रोजेक्ट सुरू केला आहे.



- मोहन अत्रे
@@AUTHORINFO_V1@@