कथावाचक मोरारी बापूंकडून राममंदिरसाठी ५ कोटींची देणगी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jul-2020
Total Views |

morari bapu_1  



भावनगर : अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी ५ ऑगस्टची तारीख निश्चित करण्यात आली आहे. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुपारी १२ वाजता पूजा करून मंदिर बांधणीसाठी पायाभरणी करतील. राम मंदिराच्या बांधकामासाठी प्रसिद्ध कथावाचक मोरारी बापू यांनी पाच कोटी रुपयांची देणगी देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय, राम मंदिरासाठी देशातील सर्व हिंदूंकडून पैसे गोळा केले जातील, असे विश्व हिंदू परिषद म्हटले आहे.


भावनगरमधील तलगाजरडामध्ये डिजिटल माध्यमातून मोरारी बापू यांनी रामकथा वाचन केले. यावेळी व्यासपीठावरुन राम मंदिर बांधण्यासाठी पाच कोटी रुपये देण्याची घोषणा केली. सर्वात आधी रामजन्मभूमीसाठी पाच कोटी पाठविले जातील. जे प्रभू श्रीराम यांच्या चरणी तुळशीपत्र म्हणून भेट दिली जाईल, असे मोरारी बापू यांनी सांगितले. मोरारी बापू यांनी रामकथा वाचन केल्यानंतर सांगितले की, चित्रकूट धाम तलगाजरडा येथील आश्रमशाळेच्या वतीने रामजन्मभूमीसाठी पाच लाख रुपये दिले जातील. तसेच, जे श्रोते रामभक्त आहेत आणि राम मंदिर निर्माणासाठी दान देऊ इच्छित आहेत त्यांच्या वतीने पाच कोटी रुपयांची देणगी दिली जाईल. याशिवाय, राम मंदिर बांधण्यासाठी प्रत्येक गावातील आणि शहरातील लोकांकडून देणगी गोळा केली जाईल, जेणेकरून राम मंदिराचे बांधकाम लोकसहभागातून होईल आणि त्यात सर्व हिंदूंचे पैसे असतील, असे विश्व हिंदू परिषदेने म्हटले.
@@AUTHORINFO_V1@@