राम मंदिराचा लढा राहणार अजरामर ; २००० फूट खोल भूगर्भात ठेवणार पुरावे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jul-2020
Total Views |

rammandir_1  H





अयोध्या :
अयोध्येत राम मंदिराचा इतिहास हजारो वर्षांपर्यंत जतन करण्याच्या उद्देशाने मंदिराच्या गर्भगृहातील २००० फूट खोलीवर टाइम कॅप्सूल म्हणजेच कालपत्र ठेवले जाईल. या पत्रात मंदिराची संपूर्ण माहिती व इतिहास असेल. जेणेकरून भविष्यात जन्मभूमी आणि राममंदिराचा इतिहास सहज उलगडला जाईल. यावर कोणताही वाद होणार नाही. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल यांनी ही माहिती दिली.
 
हे विधी ३ ऑगस्टपासून सुरू होईल


बिहारमधील रहिवासी असलेल्या कामेश्वर चौपाल यांनी ९ नोव्हेंबर १९८९ रोजी अयोध्येत राम मंदिराची पायाभरणी केली होती. तेव्हापासून आम्ही राम मंदिर बांधण्याची वाट पाहत आहोत. ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराची पायाभरणी करतील. यापूर्वी ३ ऑगस्टपासून वैदिक विधी सुरू होतील. ५ ऑगस्ट रोजी प्रस्तावित भूमीपूजन सोहळा दूरदर्शनवर थेट प्रसारित होईल.


कालपत्र (टाइम कॅप्सूल) म्हणजे काय?


टाईम कॅप्सूल कंटेनरसारखे असते. हे सर्व प्रकारच्या हवामानाचा सामना करू शकते. हे सहसा भविष्यात लोकांशी संवाद साधण्यासाठी वापरले जाते. हे पुरातत्वशास्त्रज्ञ किंवा इतिहासकारांना अभ्यास करण्यास मदत करते. ३० नोव्हेंबर २०१७ रोजी, स्पेनमधील बुर्गोसमध्ये सुमारे ४०० वर्ष जुने कालपत्र म्हणजेच टाइम कॅप्सूल मिळाले. ते येशू ख्रिस्ताच्या मूर्तीच्या रूपात होते. या पुतळ्यामध्ये सुमारे १७७७ पर्यंतची आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक माहिती होती.


२००फूट खोलीच्या मातीचा नमुना घेण्यात आला


राम मंदिराचे मुख्य आर्किटेक्ट निखिल सोमपुरा म्हणाले की, पंतप्रधानांच्या कार्यक्रमानंतर मंदिराचे बांधकाम सुरू होईल. २००मीटर खोलीच्या मातीचा नमुना घेण्यात आला. ज्याचा अद्याप अहवाल मिळालेला नाही. अहवालानुसार, एलएनटी कंपनी पाया खोदण्यास प्रारंभ करेल. अहवालानंतर पायाची खोली निश्चित केली जाईल. मंदिराचे व्यासपीठ १२ फूट ते १५ फूट दरम्यान आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@