राम मंदिर भूमिपूजन दिनी घरातच राहून प्रार्थना करा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jul-2020
Total Views |

ram mandir_1  H


कोरोनाचा धोका लक्षात घेऊन राम जन्मभूमी ट्रस्टचे भाविकांना आवाहन

मुंबई : सर्वत्र सगळीकडे अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाच्या सोहळ्याची चर्चा आहे, अनेक वर्षाच्या वादविवादानंतर अयोध्येत राम मंदिर उभारण्यात येत असल्याने भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र दुसरीकडे देशात कोरोनाचे संकटही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यापार्श्वभूमीवर राम जन्मभूमी ट्रस्टने खबरदारी म्हणून ५ ऑगस्टला घरातच राहून प्रार्थना करा, असे आवाहन केले आहे .


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी विशेष तयारी सुरू असून हा कार्यक्रम देशातील सर्व नागरिकांना घरबसल्या पाहायला मिळणार आहे. अयोध्येतून डीडी नॅशनल वृत्तवाहिनीवरून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.


श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाविषयी ट्विट केले आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र ज्या दिवशी राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्येत असतील, तो स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण असेल. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवरून केले जाणार आहे. त्याचबरोबर इतर वाहिन्याही कार्यक्रमाचे प्रक्षेपण करणार आहेत’, असे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने म्हटले आहे.




.
@@AUTHORINFO_V1@@