कोरोना कहर (भाग-१९) - अ‍ॅट्रोपा बेलाडोना’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jul-2020
Total Views |


homeopathy_1  H



कोरोना व्हायरसच्या या महामारीच्या साथीमध्ये एक गोष्ट फार महत्त्वाची असते व ती म्हणजे, प्राथमिक पातळीवरच आजाराचे निदान करणे व त्याच पातळीवर त्याला थांबवून त्यावर उपचार करून बरे करणे. जर या आजाराला प्राथमिक पातळीवरच रोखले, तर पुढील गुंतागुंतीचे प्रकार आपण टाळू शकतो व रुग्णदेखील लगेच बरा होतो. यासाठी या आजाराच्या लक्षणे व परिणामांचा व्यवस्थित अभ्यास करणे अत्यंत गरजेचे असते. या आजाराचा शरीरातील पेशींवर कसा परिणाम होतो. (Pathophysiology) हे जाणून घेणे फार गरजेचे असते. होमियोपॅथीमध्ये अशी काही प्रभावी औषधे आहेत, जी या आजाराला प्रथम टप्प्यातच रोखू शकतात. त्यापैकीच एक अत्यंत महत्त्वाचे औषध म्हणजे ‘अ‍ॅट्रोपा बेलाडोना’ (Atropa Belladonna).


 

‘बेलाडोना’ या औषधाचा प्रभाव मुख्यत्वे करून मेंदूच्या नसांवर, रक्ताभिसरण संस्थेवर, श्लेष्मा पटल (Mycous Membrane) रक्तवाहिन्या इत्यादींवर होत असतो. त्यामुळे रक्ताभिसरण खूप वेगाने होऊन ठिकठिकाणी रक्तसंचय होऊ लागतो. रक्तसंचय झाल्यामुळे त्या ठिकाणी ठसठसते व वेदना होऊ लागतात. श्लेष्मा पटल रुक्ष होऊन जातो.

रुग्णामध्ये दिसणारी लक्षणे ही अचानकपणे, अवचितपणे येतात व एकदम जोरदार व त्रासदायक असतात. वेदना अतिशय तीव्र असतात. अतिशय दाहक उष्णता, श्लेष्मा पटलाचा लालसरपणा आणि शरीराची शुष्कता हे या औषधाचे प्रमुख गुणधर्म आहेत. येणार्‍या वेदना या अचानकपणे येतात व अचानकपणे लुप्त होतात. दुखर्‍या भागाला सूज येते.
शरीराचे जे पोकळ किंवा नलिकामय भाग आहेत, जसे- घसा, श्वासनलिका, अन्ननलिका, आतडी, मूत्रनलिका, योनीमार्ग इत्यादी आकुंचन पावतात व प्रचंड वेदना होतात. साधारणपणे खालील गोष्टींनी रुग्णाला त्रास होतो. जसे- सूर्याच्या प्रखर उष्णतेचा रुग्णाला त्रास होतो. डोक्याला जर थंड वारा लागला, तर सर्दी झाल्यानंतर प्रकाशाचा त्रास होतो. आवाज, स्पर्श, दाबाचा त्रास होतो. तसेच खालील गोष्टींनी रुग्णाला आराम मिळतो. जसे पुढे वाकून बसल्याने, बिछान्यात आराम केल्याने रुग्णाला बरे वाटते.
रुग्णाला तापसुद्धा अचानकच येतो. तापामध्ये रुग्णाची त्वचा लालसर होते. डोळे लाल होतात. तापामध्ये अंग अतिशय तापते. परंतु, रुग्णाचे हात व पायाचे तळवे हे थंड असतात. तीव्र तापातही रुग्णाला विषाक्तपणा किंवा रक्तात विषार पसरणे, अशी चिन्हे दिसत नाहीत. तसेच तापामध्ये रुग्णाला उजेड अजिबात सहन होत नाही. तसेच आवाजही सहन होत नाही.
रुग्णाला अतिशय गरम वाटते. अंतर्गत गरमी वाटते. रुग्णाला तापामध्ये तहान लागत नाही किंवा अतिशय तहान लागते. घसा व डोळे खूप लाल होतात. रुग्णाला गिळायला अतिशय त्रास होतो. पाणीसुद्धा गिळताना त्रास होतो. टॉन्सिल्सची वाढ होते व त्यात पूसुद्धा होतो. तापामध्ये रुग्णाला लिंबू सरबत व लिंबाचे पदार्थ खावेसे वाटत राहतात. तापामध्ये रुग्णाचे डोके प्रचंड दुखते. चक्कर येते.
फुफ्फुसाच्या रक्तवाहिन्यांमध्येही रक्तसंचय झाल्यामुळे फुफ्फुसे व श्वासनलिका आकुंचन पावतात. डांग्या खोकल्याप्रमाणे खोकला येतो. रुग्णाला खोकल्यामुळे धाप लागते. श्वास घेताना कण्हायला होते. श्वसनाचा वेग जास्त होतो, तापामध्ये रुग्ण भ्रमित अवस्थेतही जाऊ शकतो. जोरात रडतो, आवाज करतो. वेगात बोलतो, खूप अस्थिर असतो, स्वभाव तापट व चिडखोर होतो. स्वभाव भित्रा होतो, पटकन रडतो, पटकन चिडतो, त्याला आजारातून पटकन बरे व्हायचे असते. घाई घाई करतो, त्याचा प्रत्येक गोष्टीत स्वातंत्र्य व मोकळेपणा पाहिजे असतो. लहान मुलांमध्ये या औषधाचा फार चांगला उपयोग होतो.
वरीलप्रमाणे लक्षणे व चिन्हे जर रुग्णामध्ये आढळली, तर बेलाडो याच्या योग्य मात्रेने कुठलाही आजार बरा होऊ शकतो. आजच्या भागात बेलाडोनाबद्दल आपण महत्त्वाची व अल्प अशी माहिती पाहिली. पुढील भागामध्ये आपण कोरोनाच्या आजारावरील उपचारांबद्दल अजून माहिती पाहूया.

- डॉ. मंदार पाटकर
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)

@@AUTHORINFO_V1@@