प्रा. पांडेय करणार राम मंदिर शिलान्यास पूजा विधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jul-2020
Total Views |

Ram Mandir_1  H






गोरखपूर : ५ ऑगस्ट २०२०, रोजी अयोद्धेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते श्रीराम मंदिर शिलान्यास पूजन होणार आहे. संपूर्ण शिलान्यास पूजन विधी प्रा. विनय कुमार पांडेय करणार आहेत. काशी विश्व हिंदू विद्यापीठात त्यांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय आचार्य दल पूजनाची तयारी करत आहे. आचार्य दलात प्रा. रामचंद्र पांडेय व प्रा. रामनारायण द्विवेदी यांचा सामावेश असणार आहे.


श्रीराम जन्मभूमी शिलान्यास पूजन विधी तीन तास सुरू असेल, अशी माहिती प्रा. विनय यांनी दिली आहे. मात्र, मुहूर्ताची वेळ गोपनीय ठेवण्यात आली आहे. वियन यांना पूजेचा मान मिळाल्याने त्यांच्या संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण आहे. कुटूंबातील प्रत्येक जण आनंदात आहे. विनय पांडेय हे सध्या वाराणसी हिंदू विद्यापीठात ज्योतिष शास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. 


तसेच काशी विद्वत् परिषद संघटनेचे मंत्रीही आहेत. संस्कृत, हिंदी, इंग्रजी या भाषांवर प्रभूत्व असणाऱ्या प्रा.विनय यांचे ज्योतिष, वास्तू व कर्मकांड आदी विषयांत आंतरराष्ट्रीय स्तरावर १४ आणि राष्ट्रीय स्तरावर ४० शोधपत्र आणि सात पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. यापूर्वी पंतप्रधानांच्या अनुष्ठान पूजनाच्या विविध कार्यक्रमातही सहभागी झाले आहेत. 


रामजन्मभूमीला राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय महत्व आहे. भगवान श्रीराम सनातन संस्कृतीचे आराध्य दैवत मानले जाते. त्यांची जन्मभूमी असलेल्या अयोध्या सनातन संस्कृतीचा वारसा मानली जाते. जन्मभूमी वर श्रीराम मंदिरच्या निर्माणापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिलान्यास पूजन होणार आहे. श्रीराम भक्तीमुळेच मला हे सौभाग्य मिळत आहे, अशा भावना प्रा. विनय यांनी व्यक्त केल्या. 




@@AUTHORINFO_V1@@