संपूर्ण देशात 'दिल्ली मॉडेल' राबविण्यात येणार ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jul-2020
Total Views |


delhi_1  H x W:

नवी दिल्ली: देशातील कोरोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार सोमवारी महत्वपूर्ण बैठक घेणार आहे. यामध्ये देशातील इतर राज्यांनी दिल्लीतील कोविड १९ मॅनेजमेंट मॉडेलचा अवलंब करण्याचा संबंधित आराखडा तयार केला जाईल. केंद्रीय गृहसचिव अजय भाल्ला यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल. शनिवारी एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने ही माहिती दिली असल्याचे वृत्त हिंदी वृत्तवाहिनीने दिले.



या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “कोविड -१९च्या घटनांमध्ये होणारी वाढ रोखण्यात दिल्लीतील यशस्वी मॉडेलची उच्च पातळीवर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्याची गरज आहे. याबाबत बैठक बोलावली आहे. याशिवाय दिल्लीत येत्या काही दिवसांसाठी कोविड १९च्या बाबतीत पुढील रणनीतीवरही चर्चा होईल." यानुसार दिल्लीचे मुख्य सचिव विजय देव केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर दिल्लीतील कोविड -१९ परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी आखण्यात आलेल्या व्यवस्थापन रणनीतीचे महत्त्वाचे घटक सादर करतील. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि नीती आयोगाचे सदस्य व्ही.के. पॉल आणि अन्य अधिकारी या बैठकीस उपस्थित राहतील.


@@AUTHORINFO_V1@@