सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशी होणार ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jul-2020
Total Views |

Sushant Singh Rajput _1&n




नवी दिल्ली :
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्यातील पोलीस दल सक्षम असल्याचे म्हटल्यानंतर खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. वकील इशाकरण सिंह भंडारी यांनी ट्विट करत या बद्दलची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून सीबीआय फॉर सुशांत, अशी मोहिम ट्विटरवर चालवली जात आहे. जर पंतप्रधान कार्यालयाने या प्रकरणात हस्तक्षेप केला तर या प्रकरणाची सुनावणी सीबीआयकडे दिली जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केला जात आहे. 






भाजप खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी सुशांतला न्याय मिळावा यासाठी गेल्या काही दिवासांपासून या प्रकरणावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी वारंवार हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे, अशी मागणी केली आहे. त्यांचे सहकारी वकील इशाकरण यांनी केलेल्या ट्विटमुळे या प्रकरणी लवकरच सुत्रे हलतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अभिनेता सुशांतच्या रहस्यमयी मृत्यूप्रकरणी १५ जुलै रोजी पंतप्रधानांना पत्र लिहीले होते. भाजपच्या अन्य खासदारांनाही या प्रकरणी आवाज उठवण्याचे आवाहन स्वामी यांनी केले होते. 





काय म्हटले होते पत्रात, "माझे सहकारी इशाकरण भंडारी यांनी सुशांत सिंह राजपूत याच्या प्रकरणात काही संशोधन केले आहे. सुशांतचे अकाली जाणे हे आपण जाणताच, या प्रकरणी पोलीसांचा तपास अद्याप सुरू आहे. मुंबईतील सुत्रांच्या हवाले मला समजले आहे की, या प्रकरणात दुबईतील डॉनशी संलग्न काही पुरावेही पोलीसांना आढळले आहेत, बॉलीवुडमध्ये बरेच जण सुशांतची आत्महत्या झाली असावी, असे दाखवण्यासाठी पोलीसांवर दबाव टाकत आहेत."








@@AUTHORINFO_V1@@