राम मंदिराचे ई-भूमिपूजन करा : मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jul-2020
Total Views |

Sanjay Raut _1  


मुंबई : कोरोनाचे संकट असले तरीही मुख्यमंत्री म्हणून मी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला जाऊन येणार आहे. मुळात कोरोनाचे संकट असताना तुम्ही राम मंदिराचे ई-भूमीपूजन करू शकत नाही, का सवाल आता उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. राम मंदिर भूमिपूजन हा हजारो भाविकांच्या आस्थेचा विषय आहे. सर्वसामान्यांना मंदिरात जाण्यास बंदी आहे, अशावेळी आपण ई-भूमिपूजन करू शकत नाही का, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.


शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 'सामना'साठी मुलाखत घेतली. मुलाखतीच्या दुसऱ्या आणि अंतिम भागात उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवर मते व्यक्त केली आहेत. राम मंदिर भूमिपूजनाच्या मुद्द्यावरही अखेर मौन सोडले. राम मंदिराच्या भूमिपूजनाला जाणार की नाही ? एक व्यक्ती म्हणून हो की नाही हे मी काहीही सांगेल. मी मुख्यमंत्री आहे, पूर्ण सुरक्षेत मी व्यवस्थित जाऊन येईलही, असेही ते म्हणाले.


मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे अयोद्धेत गेले होते. कोरोनाचे संकट असल्याने त्यांना शरयू किनारी आरती करण्यासपासून थांबवले होते. याच वरून उद्धव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. आज कोरोनाचे संकट वाढले असताना भूमिपूजन सोहळा केला जात आहे, त्याचे काय असा प्रश्न त्यांनी विचारला.




@@AUTHORINFO_V1@@