अनलॉक : चित्रपटगृहे सुरु होण्याची शक्यता!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2020
Total Views |

Multiplex_1  H



सॅनिटायझेशनसाठी पीव्हीआरचा डेटॉलशी करार!

मुंबई : कोरोनामुळे लॉक झालेला देश पुन्हा हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी देशात अनलॉक प्रकिया सुरु झाली आहे. या अंतर्गत अनेक गोष्टींना, सेवांना सुरु करण्यासाठी सशर्त परवानगी देण्यात आली आहे. बहुतेक गोष्टींना आता सूट देण्यात आल्यामुळे, सरकार लवकरच चित्रपटगृहे उघडण्यास परवानगी देईल असे बोलले जात आहे. मल्टीप्लेक्स चेन पीव्हीआर सिनेमाने प्रेक्षकांच्या सुरक्षेसाठी रेकिट बेन्कीझरच्या लोकप्रिय सॅनिटायझेशन ब्रँड डेटॉलशी करार केला आहे, यावरूनही लवकरच मल्टीप्लेक्स उघडतील असा अंदाज वर्तवला जात आहे. सरकारच्या मार्गदर्शक सूचना पाळून व त्यांची मान्यता घेऊन थिएटर्स उघडली जातील, असे पीव्हीआर सिनेमाकडून सांगण्यात आले आहे.


कंपनीने सादर केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, या करारांतर्गत ७० शहरांमधील १७५ पीव्हीआर सिनेमामध्ये येणाऱ्या प्रेक्षकांसाठी स्वच्छता आणि सेनिटायझिंग प्रोटोकॉल सुनिश्चित केला जाईल. आरबी हेल्थ दक्षिण आशियाचे मुख्य विपणन अधिकारी पंकज दुहान यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ‘पीव्हीआरबरोबर भागीदारी करून आम्ही चित्रपट प्रेक्षकांना सर्वोत्कृष्ट संरक्षण देऊ इच्छितो.’ पीव्हीआर सिनेमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौथम दत्ता म्हणाले की, ‘चित्रपट पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांना अधिक चांगले आणि सुरक्षित वातावरण कसे उपलब्ध करून देता येईल यावर मल्टीप्लेक्स चेन गेल्या काही महिन्यांपासून विचार करत आहे. आता आम्ही सर्व स्तरांवर सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी डेटॉलशी भागीदारी केली आहे.’


हायजीन प्रोटोकॉल, सोशल डिस्टेंसिंग आणि फूड सेफ्टी उपायांची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू असल्याचे, पीव्हीआर सिनेमाने म्हटले आहे. सर्व टचपॉईंट्सवर किमान मानवी संवाद साधला जाईल. सर्व कर्मचार्‍यांची दैनंदिन आरोग्य तपासणी केली जाईल. सर्व कर्मचारी पीपीई किट, मास्क, हातमोजे आणि अतिरिक्त संरक्षणासाठी फेस शिल्ड परिधान करतील, असेही पीव्हीआरने सांगितले आहे. या व्यतिरिक्त, संपूर्ण कॅम्पसमध्ये ईपीएद्वारे मंजूर केलेली यूएलव्ही स्वच्छता प्रक्रिया नियमित अंतराने पार पाडली जाईल. त्याअंतर्गत, इलेक्ट्रोस्टेटिक मशीनद्वारा पृष्ठभागावर अँटी-मायक्रोबियल लेयरची कोटिंग लावली जाईल, असे पीव्हीआरकडून सांगण्यात आले आहे.




@@AUTHORINFO_V1@@