मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कोरोनाची लागण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2020
Total Views |

Shivrajsinh Chouhan_1&nbs
भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांचे स्वॅब टेस्टींग करण्यात आले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून मुख्यमंत्री शिवराज चौहान यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याबाबत त्यांनी ट्वीट केले आहे.
 
 
चौहान यांच्या अनुपस्थितीत मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा त्यांचा कार्यभार सांभाळणार आहेत. चौहान यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना टेस्ट करण्याचे तसेच क्वारंन्टाइन होण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री चौहान यांनी स्वत: क्वारंन्टाइन होणार असल्याचे सांगितले असून कोरोनासंदर्भात होणाऱ्या सर्व बैठकांना ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावणार आहेत.
 
 
 
 
 
 
शिवराजसिंह चौहान यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “मला कोरोनाची लक्षणे जाणवत आहेत. टेस्ट केल्यानंतर माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करुन घ्यावी तर माझ्या निकट संपर्कात आलेल्यांनी क्वारंटाईन व्हावे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मी स्वतः क्वारंटाईन होत आहे. मी उपचार घेणार आहे. सर्वांनी सावधानता बाळगावी.” असा संदेश त्यांनी जनतेला दिला आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@