कोरोना उपचारासाठी सिप्लाने लॉन्च केली टॅब्लेट...किंमत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jul-2020
Total Views |

favipiravir_1  





नवी दिल्ली : भारतातील अग्रगण्य 'सिप्ला' कंपनीने शुक्रवारी कोरोनावरील औषध निर्माण करण्यासाठी ड्रग रेलग्युलेटरतर्फे फॅविपिराविर (Favipiravir) भारतात लॉन्च करण्याची घोषणा केली. हे औषध देशात 'सिप्लेन्झा' Ciplenza ब्रॅण्डने मिळणार असल्याचेही सांगितले.


या औषधाचा वापर कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना दिले जाते. सिप्लातर्फे सांगण्यात आले की, Favipiravir चे जेनेरिक स्वरुप Ciplenza ब्रॅण्ड नावाने भारतात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च केले जाणार आहे. या एका गोळीची किंमत ६८ रुपये आहे. Favipiravir ओरल अँटी व्हायरल औषध आहे. कोरोनाच्या सौम्य लक्षणांसाठी वापरले जात आहे.



कंपनीतर्फे देण्यात आलेल्या माहितीत म्हटल्यानुसार, 'या औषधाची निर्मिती आणि वितरण हे सुरळीत केले जाण्याची काळजी घेतली जाणार आहे, जेणेकरून भारतात सर्व ठिकाणी हे औषध उपलब्ध होईल. तसेच हे औषध कोरोना रुग्णांवर अतिदक्षता किंवा आपत्कालीन स्थितीतच केले जाणार आहे.'





Ciplenza साठी सिप्ला आणि CSIR-Indian Institute of Chemical Technology (IICT) यांनी एकत्रितरित्या काम केले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला ग्लेनमार्क फार्मातर्फे अँटी फ्लू ड्रग favipiravir औषधाची चाचणी जेनरिक स्वरुप दीडशे रुग्णांवर करण्यात आली होती. याचा अहवाल सकारात्मक आला आहे.







@@AUTHORINFO_V1@@