माझी मुलाखत सुरू असताना सरकार पाडून दाखवा : मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jul-2020
Total Views |
Uddhav Thackeray _1 





मुंबई
: माझी मुलाखत सुरू असताना सरकार पाडून दाखवा, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करत विरोधी पक्षाला आव्हान दिले आहे. दैनिक 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत उद्धव यांनी हे वक्तव्य केले आहे. खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा टीझर शुक्रवारी प्रक्षेपित करण्यात आला आहे.




राज्य सरकारच्या कारभारातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे. चीनच्या मुद्द्यावरून त्यांनी केंद्राला लक्ष्य केले आहे. तसेच नागपूर महापालिका विरुद्ध तुकाराम मुंढे यांच्यातील वादावरही त्यांनी प्रतिक्रीया दिली आहे. यापूर्वी खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची मुलाखत घेतली होती.



@@AUTHORINFO_V1@@