स्वातंत्र्य दिनासाठी गृहमंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jul-2020
Total Views |
Independence day_1 &


सामुहिक आयोजन न करता तंत्रज्ञानाचा वापर करून उत्सव साजरा करा; गृहमंत्रालयाचे आवाहन


नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने शुक्रवारी स्वातंत्र्यदिनाशी संबंधित मार्गदर्शक सूचना जारी केली. ही सूचना सर्व सरकारी कार्यालये, राज्य सरकार आणि राज्यपाल यांना पाठविण्यात आले आहे. सूचनांमध्ये स्वातंत्र्यदिनी सामूहिक कार्यक्रम टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा. देशातील कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग लक्षात घेता गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.


सहसचिव अनुज शर्मा यांनी सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेश यांना यासंबंधित पत्र लिहिले आहे. या पत्रात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावात स्वातंत्र्यदिन कसा साजरा करावा यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. प्रत्येक राज्यात सकाळी ९ वाजता राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. त्यानंतर राष्ट्रगीत होईल. पोलिस, सैन्यदल, होम गार्ड, एनसीसी यांच्या परेड होतील. परेडनंतर मुख्यमंत्र्यांचे भाषण होईल. कोविड-१९ चे संकट लक्षात घेता या कार्यक्रमात लोकांची गर्दी होऊ नये याची खबरदारी घेतली जाणार आहे.


राज्य सरकारांना सल्ला देण्यात आला आहे की, कार्यक्रमांसाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि सफाई कामगारांना सन्मान देण्यासाठी या कार्यक्रमात आमंत्रित करावे. ज्या लोकांनी कोरोनावर मात केली आहे. यानंतर निरोगी झाले आहेत. अशा लोकांनाही कार्यक्रमांमध्ये बोलावले जाऊ शकते.


तसेच कोरोना विषाणूची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन यंदा दिल्लीतील लाल किल्ल्यातही वेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला शालेय विद्यार्थ्यांना बोलवण्यात येणार नसून बसण्यासाठी सतरंजीऐवजी खुर्च्यांचा वापर करण्यात येणार आहे. तसेच यादिवशी पोलिसही पीपीई किटमध्ये दिसतील. तर राष्ट्रपती भवनात दुपारी होणाऱ्या कार्यक्रमात देशातील आरोग्य तज्ञांना आमंत्रित करण्यात आले असून कोरोना वॉरिअर्स या कार्यक्रमात आकर्षणाचा केंद्रबिंदू असतील.




@@AUTHORINFO_V1@@