पोलिसांच्या क्वारंटाईन सेंटरमध्येच रंगली हुक्का पार्टी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jul-2020
Total Views |

Hukah party_1  


ठाण्यातील माजिवाडा क्वारंटाईन सेंटरमधला धक्कादायक प्रकार उघडकीस!


ठाणे : कोरोना संकट वाढत असतानाही हुक्क्याचे बार, डीजे म्युजिक आणि झिंगलेल्या तरुण, तरुणींचा मदमस्त नाच, अशा बेधुंद वातावरणात ठाणे येथील एका हॉटेलात हुक्का पार्टी रंगली. माजिवाडा नाक्यावर असलेल्या हॉटेल कॅपिटल येथे हा सगळा प्रकार घडला. हे हॉटेल पोलिसांसाठी क्वारंटाईन सेंटर म्हणून राखीव असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली. याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होताच पोलिसांनी तातडीने दखल घेतली आणि कारवाई केली. ठाणे मनपा आयुक्त विजय सिंघल यांनी ठाणे पोलिसांसाठी माजिवाडा येथील हॉटेल क्वारंटाईन सेंटर म्हणून आरक्षित केले होते.


पोलिसांनी केलेल्या कारवाईत १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कोरोना संकटकाळात कोणत्याही कारणास्तव एकत्र येण्यास मनाई आहे. तसेच, सोशल डिस्टन्सिंगचे पालन काळजीपूर्वक केले जावे यासाठीही प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, सर्वच नियमांचे उल्लंघन करत या पार्टीबहाद्दर तरुण, तरुणींनी कायदा धाब्यावर बसवला.


ठाणे मनपा आयुक्त विजय सिंघल यांनी ठाणे पोलिसांसाठी माजिवाडा येथील हॉटेल क्वारंटाईन सेंटर म्हणून आरक्षित केले होते. या हॉटेलमध्ये एकूण ३२ खोल्या आहेत. त्यापैकी २५ खोल्या या कोरोना लागण झालेल्या आणि सौम्य लक्षणे आढळणाऱ्या पोलिसांसाठी आरक्षित होत्या. याच ठिकाणी पोलिसांची क्वारंटाईन सोय करण्यात आली होती. याच खोलीत काही तरुण आणि तरुणी असे १२ ते १५ जण हुक्कापार्टी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.









@@AUTHORINFO_V1@@