आयुक्तांची सत्य वाचा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jul-2020
Total Views |

BMC_1  H x W: 0



कोरोना केव्हाही उचल खाऊ शकतो याची पक्की जाणीव नवे सरसेनापती इकबालसिंह चहल यांना आहे. त्यामुळे त्यांनी समोरची लढाई लढत गनिमी काव्याचाही वापर केला आहे. सैनिकांना गल्लोगल्ली फिरायला लावत संशयितांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे कोरोना नियंत्रणात राहिला, असे आजघडीला वाटत असले तरी तो संपत चालला आहे असे नाही.



लस उपलब्ध होईपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या शून्यावर आणणे अशक्य असल्याची कबुली देत मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांनी यातील संदिग्धताच दूर केली, हे एका अर्थाने बरेच झाले. त्यामुळे कोरोनाबाधितच नव्हे, तर आम जनता आता या संसर्गजन्य आजाराबाबत खबरदार राहील; ‘अन्यथा तुम्ही खबरदार, तर आम्ही जबाबदार’, ‘कोरोनाला हरवणार, महाराष्ट्र पुन्हा उभा करणार’, असे भावनिक आवाहन म्हणजे लोकांना गाफील ठेवण्याचा प्रकार असतो. एखाद्या युद्धात होणारी वातावरणनिर्मिती ही तात्पुरती ऊर्जा असते, त्याने सैनिकांना स्फुरण चढते. त्या जोरावर ते चाल करतात आणि तो क्षण निर्णायक ठरतो. पण, नियोजनबद्ध रचना आणि मार्गदर्शन करणारा सेनापती हेच सैनिकांना विजयासमीप नेऊन ठेवतात. पण, राज्य शासनाने अनेक आघाड्यांवर सेनापतींची बदली करत सैनिकांमधील संदिग्धता वाढविली. त्यामुळे शत्रू शिरजोर झाला.



मुंबई-ठाण्यात व्यूहरचना एकाची, नेतृत्व दुसर्‍याचे, तो सांगेल तसे सैनिकांनी चाल करायची, त्यामुळे कोरोनाचे फावले आणि सैनिकांप्रमाणेच त्याने काही मोहरेही टिपले. मुंबईकरांच्या जनतेचे सुदैव इतकेच की, सैनिकांची पळापळ झाली नाही. त्यांनी चढाई चालूच ठेवली. त्यामुळे खोलवर चढाई केलेल्या कोरोनाला अधिक खोलवर चढाई करणे शक्य झाले नाही. याचा अर्थ कोरोनाने हार पत्करली असे नव्हे. त्यामुळे गाफील राहून चालणार नाही. कोरोना केव्हाही उचल खाऊ शकतो याची पक्की जाणीव नवे सरसेनापती इकबालसिंह चहल यांना आहे. त्यामुळे त्यांनी समोरची लढाई लढत गनिमी काव्याचाही वापर केला आहे. सैनिकांना गल्लोगल्ली फिरायला लावत संशयितांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे कोरोना नियंत्रणात राहिला, असे आजघडीला वाटत असले तरी तो संपत चालला आहे असे नाही. कारण, शत्रूला नामोहरम करणारी आयुधे अनेक असली तरी हमखास परिणामकारक ठरणारे ब्रह्मास्त्र (लस) अजूनही उपलब्ध झालेले नाही. धारावीत एकवर आलेली रुग्णसंख्या पुन्हा १०-१५ वर जाते. त्यामुळे लस उपलब्ध होईपर्यंत कोरोना संपला, असे म्हणून गाफील राहत येणार नाही हेच सत्य.


कोंडीत सापडलेले सत्ताधारी


विरोधी पक्ष जेवढा सक्षम तेवढा सरकारी पक्षाचा राज्यकारभार उत्तमच नव्हे, तर सर्वोत्तम होतो. महाराष्ट्रातील जनतेच्या सुदैवाने त्यांना विरोधी पक्ष सक्षम मिळाला आहे. खरेतर तोच सरकारी पक्ष असायला हवा होता. म्हणूनच महाराष्ट्रातील जनतेने त्यांना सर्वाधिक संख्येने निवडून दिले. पण स्पष्ट बहुमतासाठी काही जागा कमी मिळाल्याने विविध विचारसरणीच्या तीन पक्षांनी एकत्र येत तिघाडीची आघाडी बनविली आणि सरकार स्थापन केले आणि सरकार स्थापन केले पाहिजे होते त्या भाजपने विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारली. मुंबई महापालिकेत मित्रपक्षापेक्षा दोन जागा कमी असताना सत्तेसाठी तडजोड न करता पहारेकर्‍याची भूमिका भाजपने स्वीकारली, तर राज्यात सर्वाधिक जागा असतानाही विरोधात राहणेच पसंत केले. विरोधात असो वा सत्तेत; भाजपने आपली कामगिरी चोख पार पाडलेली आहे. सत्तेत असताना विरोधकांना कधी वरचढ होऊ दिले नाही, तर विरोधात असताना कारभार हाकणे सरकारच्या नाकीनऊ आणले आहे.


जागतिक महामारी ठरलेल्या कोरोना विषाणूच्या संकटात तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ‘कोरोना योद्ध्यां’प्रमाणे काम केले आहे. माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांची त्यांना चांगलीच साथ मिळाली. निस्पृह कार्यकर्ता कसा असावा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे किरीट सोमय्या. कोरोनाच्या संकट समयात प्रवीण दरेकर यांनी प्रशासकीय पातळीवर त्रुटी सुधारायला लावल्याने कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी त्या परिणामकारक ठरल्या. देवेंद्र फडणवीस यांनी तर कोरोना संशयितांवरील चाचण्या वाढवायला भाग पडल्याच, पण कोरोनाबाधितांच्या आणि मृतांच्या आकडेवारीतही पारदर्शकता आणायला भाग पाडले, तर सोमय्या यांनी रुग्णालय स्तरावर चाललेला बेफिकीरपणा चव्हाट्यावर आणून तो सुधारायला भाग पडला. या तिघांच्या कामातून सरकारचा निष्काळजीपणा उघड होताच, विरोधी पक्षनेत्यांच्या दौर्‍यांवर आणि प्रशासकीय अधिकार्‍यांबरोबरच्या बैठकांवर सरकारने काढलेला बंदी आदेश म्हणजे विरोधकांबाबत सरकारच्या मनात असलेली एकप्रकारची असूयाच आहे. यामुळे विरोधकांची प्रतिमा अधिक उजळ होणार आहे, पण सरकार मात्र अधिक कोंडीत सापडणार आहे. बुडत्याचा पाय खोलात म्हणतात ते यालाच!


 - अरविंद सुर्वे
@@AUTHORINFO_V1@@