राम मंदिर भूमिपूजन ठरल्यावेळीच होणार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jul-2020
Total Views |

ram mandir_1  H



अलाहाबाद उच्च न्यायालयाने साकेत गोखलेची फेटाळली याचिका!


अयोध्या : अयोध्या येथील राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचा मार्ग आता मोकळ झाला आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाला विरोध करणारी याचिका अलाहाबाद उच्चन्यायालयाने फेटाळली आहे. दिल्ली येथील पत्रकार साकेत गोखले यांनी ही याचिका दाखल केली होती.


राहुल गांधींचे निकटवर्तीय, दिल्लीतील पत्रकार साकेत गोखले यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती. देशात कोरोनाचे संक्रमण अद्याप सुरू आहे. जवळपास तीन महिन्यांच्या दीर्घ लॉकडाऊननंतर आता अनलॉक २ ची प्रक्रीया सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम हा अनलॉक २ च्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले होते. कोरोनाचे संकट कायम असताना अयोध्येतील राम मंदिराच्या कार्यक्रमासाठी जवळपास ३०० लोक उपस्थित राहणार असून, कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सरकारकडून जारी करण्यात आलेल्या गाईडलाईन्सचे यामुळे उल्लंघन होत असल्याचे या याचिकेत सांगण्यात आले होते. सोशल मिडीयावर याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अनेकांनी साकेत विरोधात आवाज उठवला होता.


५ ऑगस्टला राम मंदिर भूमिपूजन प्रस्तावित आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराचे भूमिपूजन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अद्याप याबद्दल पंतप्रधान कार्यालयाकडून पुष्टी करण्यात आलेली नाही. संत समुदाय आणि राम मंदिर चळवळीशी संबधित असणाऱ्यांनाही यावेळी आमंत्रित करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंहदेखील उपस्थित राहणार असल्याचे समजते आहे.



@@AUTHORINFO_V1@@