दुर्मीळ खवले मांजर पडले विहिरीत; पुढे काय झाले, पहा व्हिडीओ

    23-Jul-2020
Total Views | 167
pangolin_1  H x


चंद्रपूर जिल्ह्यातील घटना 


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - चिमूर तालुक्यातील शंकरपूरमधील एका विहिरीत आज सकाळी दुर्मीळ खवले मांजर पडलेले आढळून आले. शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखून या खवल्या मांजराला विहिरीबाहेर काढून घटनेची माहिती वन विभागाला दिली. त्यानंतर वनाधिकाऱ्यांनी या प्राण्याची नैसर्गिक अधिवासात सुखरुप सुटका केली. 



शेतातील किंवा जंगलाच्या आसपास असलेल्या कठडे नसलेल्या विहिरी या नेहमीच वन्यजीवांच्या मुळावर उठण्यास कारणीभूत ठरतात. बऱ्याचदा अशा विहीरींमध्ये पडून वाघ, बिबट्यांसारख्या प्राण्यांचा मृत्यू झाल्याचाही घटनाही घडल्या आहेत. आज चंद्रपूर जिल्ह्यातील शंकरपूर गावामधील विहिरीत खवले मांजर पडल्याची घटना समोर आली. येथील शेतकरी आणि 'ट्री फाऊंडेशन'चे अध्यक्ष युवराज मुरस्कर यांच्या शेतातील विहिरीत खवले मांजर पडलेले आढळून आले. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुरस्कर शेतकामासाठी शेतात गेल्यानंतर त्यांना हे खवले मांजर विहिरीत पोहताना आढळून आले. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती आपल्या शेतकरी मित्रांना दिली. त्यांच्या मदतीने या खवले मांजराला सुखरुपरित्या विहिरीबाहेर काढण्यात आले.



pangolin_1  H x
 
 
विहिरीवर बसवलेल्या इंजिनाकडील खुल्या भागामधून हे खवले मांजर विहिरीत पडल्याची शक्यता मुरस्कर यांनी वर्तवली. २.३ फूट लांब आणि ४ किलो वजनाच्या या खवले मांजराला विहिरीबाहेर काढल्यानंतर त्याची माहिती आम्ही शंकरपूर वनपरिक्षेत्राचे वनरक्षक केदार यांनी दिल्याचे मुरस्कर यांनी सांगितले. त्यानंतर वनाधिकाऱ्यांनी खवले मांजराला ताब्यात घेऊन त्यांची पुन्हा नैसर्गिक अधिवासात सुटका केली. खवले मांजर बचावाच्या या कामात मुरस्कर यांना शेतकरीमित्र भीमराव शेंडे, महादेव खांदे, संदीप खांदे अक्षय चौधरी, स्नेहल शेंडे यांनी मदत केली. वन्यजीवांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीच्या बाजारपेठेत खवले मांजराला मोठी मागणी असून त्यांची मोठ्या प्रमाणावर तस्करी होते.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
Bihar election : बिहार निकालावरून मविआत अंतर्गत टीका जोरावर

Bihar election : बिहार निकालावरून मविआत अंतर्गत टीका जोरावर

(Bihar election) नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळाले आणि देशभर भाजपा कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बिहारमध्ये भाजपाप्रणित आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अनेक सभा घेतल्या होत्या.ज्या यशस्वी ठरल्या. आता देखील या निकालानंतर मुंबई बाबत बोलताना 'मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर निवडून येईल',असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.तर प्रदेश कार्यालय मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत..

Local Body Election : BMC निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा मोठा निर्णय, ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर!

Local Body Election : BMC निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा मोठा निर्णय, ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर!

(Local Body Election) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या असताना, राज्यभरातील अनेक पक्षांकडून निरनिराळे निर्णय घेतले जात आहेत. (Local Body Election) अशातच आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने BMC निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जाहीर केलेल्या या यादीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. (Local Body ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121