आनंदवार्ता ! बँक कर्मचाऱ्यांना मिळणार पगारवाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jul-2020
Total Views |

Bank _1  H x W:





मुंबई :
बँकींग क्षेत्रात कर्मचाऱ्यांच्या पगारवाढी संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय़ घेण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनवृद्धीच्या प्रश्नावर पडदा टाकण्यात आला आहे. २२ जुलै रोजी मुंबईतील स्टेट बँकेच्या मुख्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांना १५ टक्के वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


बैठकीत IBA आणि UFBU या दोन्ही संघटनांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या लावून धरल्या होत्या. उशीरापर्यंत सुरू असलेल्या बैठकीत अखेर १५ टक्के वेतन वृद्धीवर तोडगा निघाला आहे. या निर्णयामुळे एकूण नऊ बँकांवर ७ हजार ९०० कोटींचा वार्षिक बोझा पडणार आहे. IBA आणि UFBU या कर्मचारी संघटनांनी मे २०१७ पासून ही मागणी लावून धरली होती. यापूर्वीची वेतनवृद्धी नोव्हेंबर २०१७ पासून प्रलंबित होती. हा निर्णय बँकींग प्रबंधन प्रतिनिधीत्व करणाऱ्या आयबीए आणि बैंक कर्मचारी संघटनांची प्रतिनिधीत्व करणाऱ्या यूनाइटेड फोरम आफ बँक युनियन्सच्या सदस्यांमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.


२०१७ पासून लागू होणार वेतनवृद्धी 

बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानंतर नोव्हेंबर २०१७ पासून ही पगारवाढ लागू होणार आहे. वार्षिक १५ टक्के वेतनवृद्धी ३१ मार्च २०१७ च्या वेतन बिलाच्या आधारावर दिली जाणार आहे. सार्वजनिक, खासगी यांसह विदेशी बँका अशा ३७ बँकांना हा निर्णय लागू असेल तसेच आयबीएकडे या सर्व बँकांच्या वेतनवृद्धीसंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.







@@AUTHORINFO_V1@@