महिला, खतना आणि माणुसकी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jul-2020   
Total Views |

khatna_1  H x W



कुराणामध्ये महिला खतना प्रथेचा उल्लेखच नाही. मात्र, काहीजण म्हणतात, हदिसमध्ये महिला खतना प्रथेचा उल्लेख आहे. मोहम्मद यांना उम हबिबा नावाची महिला सांगते की, “तुम्ही बंदी घातली तर मुलींची खतना पद्धत थांबेल.” यावर मोहम्मद म्हणतात, “खतना करणे सक्तीचे नाही, पण ते केल्याने चेहर्‍यावर तेज येते आणि त्या स्त्रीच्या पतीला आनंद मिळतो.” अर्थात, काही स्वार्थी विकृत लोकांनी याचा संदर्भ देत असे जाहीर केले की, मोहम्मद यांची खतना पद्धतीला मान्यता होती. या गैरसमजुतीमुळे आजही जगात महिलांवर हा अनन्वित अत्याचार होत आहे. याचा विचार कोण करणार?



जगभरात स्वातंत्र्य, समता, न्यायासाठी नव्हे, मानवी जगण्यासाठी कितीतरी आंदोलन-मोर्चे होतात. पण जगभराचा कानोसा घेतला तर जाणवते की ज्याच्याविरोधात अख्ख्या जगाने पेटून उठायला हवे, असे काही विषय आजही आहेत. त्यापैकी एक महिलांचा होणारा खतना. मुलींचा होणारा खतना हा विषय खरेतर महिलांच्या मासिक पाळी इतकाच निषिद्ध विषय. सुदान या मुस्लीमधर्मीय देशाने महिला खतना या अघोरी प्रकाराला कायद्याने बंदी आणली आहे. २०१५ सालीसुद्धा हा विषय सुदानच्या पार्लमेंटरी बोर्डाकडे आला होता. पण, त्यावेळचे सत्ताधारी ओमर अल बशिर यांनी महिला खतना हा श्रद्धा-संस्कृतीचा विषय म्हणून त्याविरोधात निर्णय घेतला नाही. पण, सुदानचे सरकार बदलले आणि नवीन पंतप्रधान अब्दुल्ला हमडोक यांनी या विषयावर विधेयक पारित केले. त्यानुसार जुलै २०२०पासून सुदानमध्ये महिला खतना प्रकार हा गुन्हा मानला जाईल. आज जगातल्या ३० देशांत ही क्रूर प्रथा अस्तित्वात आहे.



आशिया खंडामध्ये इराण आणि इंडोनेशियामध्ये महिला खतना पद्धत आहेच. संयुक्त राष्ट्राच्या मध्यस्थीने किंवा आंतरराष्ट्रीय दबावामुळे आज २४च्या वर देशांनी या पद्धतीवर कायदेशीर बंदी आणली आहे. पण, कायदेशीर बंदी सामाजिक बंदी होतेच असे नाही. त्याचाच परिणाम आज जगात अंदाजे २० कोटी महिला आहेत की ज्यांचा खतना झाला आहे. असो, यावर काही लोक म्हणतात की, त्यात काय, मुस्लीम धर्मात पुरुषांचाही खतना होतो. मग महिलांच्या खतनेचे काय विशेष? पण, विशेषच आहे आणि अतिशय दु:खदायक, संतापजनक विशेष आहे.संयुक्त राष्ट्रसंघाने केलेल्या अभ्यासानुसार, मुलींचा खतना का केला जातो, यावर काही निष्कर्ष आधारीत आहेत. साधारण पाच ते नऊ वर्षांपर्यंतच्या मुलींचा खतना केला जातो. हे करताना मुलींचे हात पाठी बांधले जातात. डोळ्यावर पट्टी लावली जाते. या कामात अनुभवी असलेली व्यक्ती ब्लेडने किंवा तत्सम तीक्ष्ण हत्याराने मुलींच्या योनीचा बाहेरील भाग कापतात. मूत्रविसर्जन होईल इतकेच योनी छिद्र शिवले जाते. यामुळे मुलींचा तो भाग कायमच संवेदनाहीन होतो. त्यामुळे पुढच्या आयुष्यात या मुलींना कोणताही लैंगिक आनंद जाणवणार नसतो. रूढीवादी लोकांना वाटते की, संवेदनाच नसल्याने स्त्रियांना कोणताही आनंद मिळत नाही. त्यामुळे स्त्रिया लैंगिक सुखासाठी कोणत्याही पुरुषाच्या नादी लागणार नाहीत. तसेच दुसरा रूढीवादी निष्कर्ष असा की, योनीछिद्र शिवल्यामुळे ती अक्षय कुमारिका राहते. तिच्या पतीसाठी हे आवश्यक आहे. छे, सभ्य-असभ्यतेच्या मर्यादा हा विषय मांडताना येत आहेत. पण, जिथे माणसासारखी माणूस असलेल्या स्त्रीला केवळ लैंगिक सुखासाठी अशाप्रकारे पीडित केले जावे?


खतना प्रथेचा मुलींवर मानसिक परिणाम होतो, मूत्रविसर्जन आणि मासिक पाळीमध्ये भयंकर शब्दातीत त्रास होतो. लैंगिक संबंध म्हणजे तिच्यासाठी मरणयातना असतात, तसेच ती बाळाला जन्म देताना इतर महिलांच्या मानाने तिच्या मृत्यूचा धोका जास्त असतो. योनीमार्गात जंतुसंसर्ग होण्याचा धोकाही असतोच. पण, तरीही ही प्रथा आजही अस्तित्वात आहे. आपल्या देशातही आहे. आपल्या देशातील मुस्लीम समाजातील एका समुदायातील महिलांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले होते की, तुम्ही ‘तिहेरी तलाक’ बंद केलात, आता महिला खतना पद्धतीही बंद करण्याचा कायदा काढा. यावर काहीजण म्हणतात, कुराणामध्ये महिला खतना प्रथेचा उल्लेखच नाही. मात्र, काहीजण म्हणतात, हदिसमध्ये महिला खतना प्रथेचा उल्लेख आहे. मोहम्मद यांना उम हबिबा नावाची महिला सांगते की, “तुम्ही बंदी घातली तर मुलींची खतना पद्धत थांबेल.” यावर मोहम्मद म्हणतात, “खतना करणे सक्तीचे नाही, पण ते केल्याने चेहर्‍यावर तेज येते आणि त्या स्त्रीच्या पतीला आनंद मिळतो.” अर्थात, काही स्वार्थी विकृत लोकांनी याचा संदर्भ देत असे जाहीर केले की, मोहम्मद यांची खतना पद्धतीला मान्यता होती. या गैरसमजुतीमुळे आजही जगात महिलांवर हा अनन्वित अत्याचार होत आहे. याचा विचार कोण करणार?

@@AUTHORINFO_V1@@