गणेशोत्सवानिमित्त 'शेमारू' स्पीकर लॉन्च : हजारो भक्तीसंगीताची पर्वणी

    22-Jul-2020
Total Views |

Shemaroo _1  H



मुंबई
: गणेशोत्सव हा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय सणांपैकी एक सण आहे. दररोज होणाऱ्या आरत्यांपासून मोदकांच्या मेजवानीपर्यंत या उत्सवाचा प्रत्येक आनंद अतिशय उत्साहात साजरा केला जातो, गरीब असो श्रीमंत, लहान असोत वा वृद्ध, श्रीगणेशाचे सर्व भक्त गणेशोत्सवात सहभागी होऊन आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी आतुर असतात.


परंतु यंदाच्या वर्षी गणेशोत्सवाचे स्वरूप वेगळे असेल, सरकारी सूचना, सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने एकमेकांपासून अंतर राखण्याच्या नियमांचे पालन हे सर्व पाहता अनेक भक्त हा सण घरीच साजरा करतील, यंदाच्या मुर्त्या छोट्या आणि पर्यावरणस्नेही असतील आणि विसर्जन देखील घरगुती स्वरूपाचे असेल. सध्या लागू असलेले सर्व नियम आणि सूचना लक्षात ठेवून शेमारूने ग्रीन प्रॅक्टिसेस अँड इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. 

श्री गणेश भजन वाणी आणि शेमारू भक्ती भजन वाणी हे प्रीलोडेड ऑडिओ स्पीकर्स त्यांच्या वेबसाईट व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध होतील आणि ग्राहकांना आपल्या घरी श्रीगणेशाची पूजा करत असताना, गणेशोत्सवाच्या काळात आरत्या ऐकता येतील व भक्तिमय वातावरण निर्माण करता येईल. 

शेमारू भक्ती भजन वाणी स्पीकरमध्ये १००० पेक्षा जास्त भजने, आरत्या, जप, मंत्र आणि स्तोत्रे आहेत. यामध्ये ८ वॅट क्षमतेची बॅटरी असून ती आठ तास चालते. अनुप जलोटा, सुरेश वाडकर, नरेंद्र चंचल, अमेय दाते, अनुराधा पौडवाल, रिचा शर्मा, साधना सरगम आणि इतर अनेक लोकप्रिय गायकांनी गायलेली प्रसिद्ध भक्तिगीते यामध्ये आहेत. श्री गणेश भजन वाणीमध्ये भजने, आरत्या, मंत्र, स्तोत्रे आणि जाप अशा २२१ भक्तिगीतांचा संग्रह आहे. 


यामध्ये हिंदी आणि इंग्रजी असे दोन भाषा पर्याय देखील आहेत. अतिशय सुबक पद्धतीने डिझाईन केलेला हा ब्ल्यूटूथ स्पीकर एका जागेतून दुसऱ्या जागी सहज नेता येतो, त्याचा आकार गोल, उभट आहे, ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी आणि ऑक्स केबल देखील असल्याने म्युझिक प्लेअर म्हणून देखील याचा वापर करता येईल. या प्लेअरची बॅटरी पाच तासांपर्यंत चालते आणि आवाजाचा दर्जा उत्कृष्ट आहे. हे स्पीकर्स ५ वॅट क्षमतेचे आहेत. ही डिव्हायसेस - devices.shemaroo.com / ecofriendlyganpati.in वर उपलब्ध आहेत.