लघु उद्योजकांनी जेईएम पोर्टलचे तंत्र शिकून घ्यावे : विनोद अग्रवाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jul-2020
Total Views |

Vinod Agarwal _1 &nb






'एमएसएमईसाठी सरकारी कंपन्यांतील व्यवसायाच्या संधी' विषयांवर मार्गदर्शन





मुंबई : केंद्र सरकार लघु उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी गव्हर्मेंट ई-मार्केट प्लेस (GeM) या पोर्टलवर एक खिडकी योजनेद्वारे व्यवसायाच्या अनेक संधी खुल्या करून देत आहे. उद्योजकांनीही हे तंत्र शिकून घेणे गरजेचे आहे, असे मत एस टेक्नॉलॉजीचे संचालक विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केले.




कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळातही सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्राला नव्या संधी प्राप्त व्हाव्यात या हेतूने लघु उद्योग भारती, महाराष्ट्र व दैनिक 'मुंबई तरुण भारत' यांच्या संयुक्त विद्यमाने विनोद अग्रवाल यांचे मार्गदर्शनपर वेबिनार २१ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आले होते. 'एमएसएमई क्षेत्रासाठी सरकारी व सार्वजनिक कंपन्यांतील व्यवसायाच्या संधी' या विषयावर आयोजित वेबिनार 'महाMTB'च्या युट्यूब व फेसबूक पेजवर लाईव्ह प्रक्षेपण केले होते. लघु उद्योग भारतीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र वैद्य, महासचिव भूषण मर्दे यांच्यासह अन्य मान्यवरही यावेळी सहभागी होते. भूषण मर्दे यांनी वेबिनारचे प्रास्ताविक केले.



लघु उद्योजकांना संधी निर्माण व्हाव्यात यासाठी केंद्र सरकारने एमएसएमई क्षेत्राकडून किमान २५ टक्क्यांपर्यंत उत्पादने खरेदी करण्याची योजना तयार केली आहे. सरकारी व सार्वजनिक कंपन्यांमध्ये लॉकडाऊनच्या काळातही प्रचंड मागणी दिसून येत आहे. या संधीचा लाभ कसा घेता याईल याबद्दलचे महत्वपूर्ण मार्गदर्शन विनोद अग्रवाल यांनी यावेळी केले. उद्यम पोर्टलवर नोंदणी कशी करावी, नोंदणीसाठीचे अटी व नियम, पब्लिक प्रोक्योरमेंट पॉलीसी आदींची विस्तृत माहिती त्यांनी दिली. एखाद्या मोठ्या ऑर्डरची पूर्तता करू न शकणाऱ्या उद्यमीसाठी 'एनएसआयसी' नोंदणीद्वारे कशा प्रकारे व्यवसाय करता येईल, जेईएम पोर्टलवर (GeM) नोंदणी कशी करावी, याचे मार्गदर्शनही त्यांनी केले. 



संरक्षण क्षेत्र, नैसर्गिक वायू व तेल, रेल्वे, केंद्र व राज्य सरकारचे विविध विभाग, पालिका व जिल्हा परिषदा आदी सर्व सरकारी संस्थांमध्ये लागणाऱ्या वस्तूंचा पुरवठा एमएसएमई उद्योजक करू शकत असल्याचे सांगत या क्षेत्राची व्याप्ती त्यांनी पटलून दिली. गव्हर्मेंट ई-मार्केट प्लेस (GeM) या वेबसाईटचे संपूर्ण काम कसे चालते याबद्दलची विस्तृत माहिती त्यांनी दिली. किचकट वाटणाऱ्या या वेबसाईटसमुळे अनेक उद्यमी या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात, परंतू तंत्रज्ञान शिकून घेतल्यास या पोर्टलवर व्यवसाय सुलभता सहज शक्य आहे, असा विश्वास त्यांनी सर्वांना दिला. 



सकाराने केली संधीची दारे खुली

देशातील निर्यात क्षेत्रात महत्वाचे योगदान असणाऱ्या एमएसएमई क्षेत्राला सामावून घेण्यासाठी सरकारी व सार्वजनिक कंपन्यांना उत्पादने पुरवण्यासाठी जेएम पोर्टलद्वारे सरकारने दारे खुली केली आहेत. तसेच या क्षेत्राला २५ टक्क्यांपर्यंत आरक्षणही दिले आहे. त्यामुळे हे पोर्टल हाताळण्याचे तंत्र शिकून घेणे आवश्यक असल्याचे मत अग्रवाल यांनी व्यक्त केले आहे. आपला स्वदेशी उद्योग पोर्टलवर पोहोचू न शकल्याने इतर देशातील उद्योग याचा लाभ घेत असतात, नाईलाजाने सरकारलाही त्यावर अवलंबून राहावे लागत आहे, अशी खंतही त्यांनी या कार्यक्रमात व्यक्त केली. 


कौतूकास्पद उपक्रम


व्यापारातील इतका महत्वाचा विषय सोप्या भाषेत व विस्तृतरीत्या समजावून सांगितल्याबद्दल लघु उद्योग भारतीतर्फे रविंद्र वैद्य यांनी अग्रवाल यांचे आभार मानले. लघु उद्योग भारतीतर्फे या वेबिनारमध्ये मीलिंद पोहनेकर, विशाल राजेमहाडीक, राजेश देढीया, मंदार लेले, उदयन श्रोत्री, एम.जी.कुलकर्णी यांनीही या वेबिनारमध्ये सहभाग नोंदवला. हा संपूर्ण कार्यक्रम https://www.facebook.com/MahaMTB/videos/284257336191934/ या फेसबूक लिंकवर उपलब्ध आहे.









@@AUTHORINFO_V1@@