ठाकरे तुम्ही 'सेक्युलर' मुख्यमंत्री आहात, भूमिपूजनला जाणे टाळा : राष्ट्रवादी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jul-2020
Total Views |

ayodhya _1  H x





मुंबई :
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याचे संकेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले आहेत. यावरुन महाविकासआघाडीत राजकारण रंगू लागले आहे. धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या प्रमुखाने धार्मिक कार्यक्रमांना जाणे टाळावे, असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते आणि माजी खासदार माजिद मेमन यांनी दिला आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत भूमिपूजन सोहळ्याला जाणारच, अशी भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मांडली.



ट्विट करत मजीद मेनन म्हणतात, “उद्धव ठाकरे हे राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी निमंत्रित आहेत. ते आपल्या वैयक्तिक क्षमतेत कोविड१९ संबंधी निर्बंधांचे पालन करुन सोहळ्यात सहभागी होऊ शकतात. मात्र धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या प्रमुखांनी विशिष्ट धार्मिक कार्यांना चालना देणे टाळावे” असे म्हंटले आहे.






तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राम मंदिर हा राष्ट्रीय अस्मितेचा हा मुद्दा आहे. माजिद मेमन यांचे मत मला माहिती नाही. सरकार किमान कार्यक्रमावर चालावे असे आमच्या सरकारचा आधार आहे. हा सरकारचा अजेंडा नाही.राम मंदिराचे भूमिपूजन आवश्यक आहे. ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो आला आहे. अयोध्येचा कार्यक्रम शासकीय आहे. उद्धव ठाकरे राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या या कार्यक्रमासाठी अयोध्येला नक्कीच जातील, असे ठाम मत व्यक्त केले.





मात्र, यावरून महाविकास आघाडीतील वैचारिक मतभेद उघड होत असल्याच्या टिकेवरून माजिद मेनन यांनी पुन्हा ट्वीट करुन आपली भूमिका बदलली. नंतरच्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “माझे ट्वीट हे माझे वैयक्तिक मत आहे, मी पक्षाचा अधिकृत प्रवक्ता नसल्यामुळे ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मत असेलच असे नाही. उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याबाबत माझा सल्ला विचारला नाही आणि त्यांनी काय करावे, याबद्दल मी सांगण्याची स्थिती नाही” असे मेमन यांनी लिहिले.


@@AUTHORINFO_V1@@