माझ्या नावे खंडणी मागणाऱ्यांवर कठोर कारवाई करा : चंद्रकातदादा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jul-2020
Total Views |

Chandrakant Dada Patil_1&





पुणे :
पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवार, दि. २० जुलै)रोजी धक्कादायक प्रकार समोर आला असून माझ्या नावाचा वापर करुन खंडणी मागितल्याची घटना समोर आली. त्यासंदर्भात सर्व कायदेशीर कारवाई केली असून, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याची गंभीर दखल घेऊन तात्काळ संबंधितांस अटक करुन कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.



पाटील म्हणाले की, "कोरोना महामारीचा सामना करताना, काहीजण याचा गैरफायदा घेत आहेत. काल सोमवार दि. २० जुलै रोजी पिंपरी-चिंचवड आणि कोथरुड मध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला. माझ्या नावाचा गैरवापर करून खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला. याविरोधात आमदार महेश लांडगे आणि आ. लक्ष्मण जगताप यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.‌



तर कोथरुड स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना मी स्वत: पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. तसेच, असे प्रकार पुन्हा होऊ नये, यासाठी कठोर उपाययोजना करावी, अशी सूचना ही पाटील यांनी केली आहे.



@@AUTHORINFO_V1@@