शेफाली वैद्य यांनी केली हिंदूविरोधी PETA ची पोलखोल !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jul-2020
Total Views |
PETA_1  H x W: |



नवी दिल्ली : प्राणी संरक्षणासाठी काम करणाऱ्या PETA या संस्थेने हिंदू सणांना बदनाम करण्याचे अभियान सुरू केले मात्र, कुर्बानीसाठी कशा प्रकारे नियम पाळायला हवेत असे म्हणत विशिष्ट धर्मांतील प्रथांबद्दल मौन बाळगण्यात धन्यता मानते. PETA युएसद्वारे प्रमोट केला जाणारा कंटेट केवळ एका धर्मासाठी पुरवला जाणारा मजकूर आहे. 


PETAच्या वेबसाईटवर ‘एनिमल इस्लाम’ नामक एक वेबसाइटचा प्रचार करण्यात आला आहे. जे लोक पशू मारण्यावर विश्वास ठेवत नाहीत, त्यांना या वेबसाईटवर येण्याचे आवाहन संस्थेतर्फे केले जाते. आपल्या धर्मातील चालीरीतीनुसार दया आणि करुणा या दोन्ही गोष्टींना महत्व देण्याचा संदेश यातून देण्यात आला आहे. तसेच ईदच्या दिवशीही जनावरांना वाचवण्यासाठी २४ तास फोनद्वारे संस्था उपलब्ध राहणार असल्याचा दावाही करण्यात आला आहे. इथवर सर्वकाही ठिक आहे. 


मात्र, पुढे पशूंना मारण्यासाठी अनेक विशिष्ट धार्मिक विधीही सांगण्यात आला आहे. ज्या हिंदू धर्मीयांना शाहकारी व्हा, असा संदेश देणारी PETA संस्था इतर धर्मांसाठी मात्र, वेगळा न्याय लावते. ज्यावेळी कुर्बांनी सारखे विषय येतात तेव्हा PETA या संस्थेने सोयीनुसार आपली तत्वे आणि नियम गुंडाळून ठेवत नवे नियम लागू केले आहेत. जर इतर धर्मात जनावरांचे मांस खाण्यासाठी नियम आहेत, तर हिंदूंना पूर्णपणे शाहकारी व्हा, असा संदेश PETA का देते, असा सवाल आता विचारला जात आहे. हिंदूंनी शाहकारी व्हा, असे सांगणाऱ्या PETA संस्थेने जनावरांची कत्तल करताना काय करायला हवे व काय नाही याची नियमावलीच जाहीर केली आहे. 


काय आहेत कुर्बानीसाठी नियम वाचा 


जनावरांनाची कत्तल करतान एकदम सावधानी बाळगली पाहिजे. कुठल्याही प्रकारची क्रुरता किंवा निर्दयीपणे प्राण्यांना हाताळल्याने पाप लागते. यामुळे प्राण्याच्या शरीरातून रक्तप्रवाह होऊ शकतो व हव्या त्या प्रमाणात मांसही मिळणार नाही. एतका जनावराची कत्तल करताना समोर दुसरे जनावर असता कामा नये, ज्यामुळे दुसरा प्राणी त्याचे मरण पाहू शकणार नाही.
कत्तलीसाठी वापरण्यात येणारा चाकू हा धारदार असावा, त्याला वेळोवेळी धार काढा. चाकूची लांबी ही 45 सेमी असायला हवी. चाकू जनावरांना दाखवू नका,



ज्यामुळे जनावरे भीतील. जनावरांचे तोंड ‘क्विब्ला’ दिशेने ठेवूनच त्यांची कत्तल करा. जनावराला एखाद्या खड्ड्यावर किंवा नाल्याच्या काठावर नेऊन मारा जेणेकरून रक्त वाहणार नाही. जनावर त्यावर उभे राहणार नाही याची काळजी घ्या. जनावर मोठ्या आकाराचे असेल तर अनेकजण मदतीसाठी लागतीलय त्यावेळी त्याचे पाय पकडण्यास सांगा. 



चांगल्या प्रकारे प्राण्याची हत्या करा, जेणेकरून त्याच्यावर वारंवार वार करावे लागणार नाही. गळ्याजवळ जितक्या नसा आहेत, त्यांना कापून टाका. श्वासनलिका आणि अन्ननलिका कापून काढा, जनावराला हातपाय मारूद्या जेणेकरून रक्त लवकर निघेल. कोणाची हत्या करणे हे परमेश्वराच्या हातात आहे, त्यानेच हे जग बनवले आहे. जनावरांना कापत असताना सहा मिनिटे त्यांचे रक्त वाहू द्या, बकरी किंवा मेंढा मारल्यावर त्याचे पाच मिनिटांपर्यंत रक्तस्त्राव झाला पाहिजे. 

दुसऱ्या जनावराला कापण्यापूर्वी संपूर्ण जागा स्वच्छ करून घ्या. रक्ताच्या वासाने दुसरे जनावर तणावात येते. हे सर्व अल्लाने बनवले आहे. त्यामुळे त्यांना जन्नत मिळणे आवश्यक आहे. आपण जर प्राण्यांशी दुर्व्यवहार केला तर आपल्याला याचा दोषी ठरवला जाईल. PETA ने मुस्लीमांना जनावरे कापण्यासाठी पद्धत सांगितली आहे. कुर्बानीपूर्वी जनावरांचे पालन पोषण करा त्यानंतर त्यांना कापा, अशी नियमावली या वेबसाईटवर सांगण्यात आली आहे.
लेखिका शेफाली वैद्य यांनी PETA च्या वेबसाइटचे स्क्रीनशॉट्स ट्विट करत या दुतोंडी भूमिकेवर आवाज उठवला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना PETA च्या सदस्यांतर्फे ट्रोल केले जात आहे. एका आंतरराष्ट्रीय संस्थेचे असे अशोभनीय वर्तन गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. ईदच्या दिवशी शाहकारी बना, असे बॅनर छापून दाखवा, असे आव्हान शेफाली वैद्य यांनी PETA या संस्थेला दिले आहे. यावर बोलण्याव्यतिरीक्त ट्रोलिंग करण्यावर ही संस्था भर देत आहे.

तसेच शाहकारी बना असे सांगणारा PETA चा माजी अधिकारी मात्र, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून चिकन, मटण आणि इतर जनावरांचे मांस ऑर्डर करायचा, अशी पोलखोल एका PETA च्या माजी अधिकाऱ्यानेच केली असल्याचा टोला शेफाली वैद्य यांनी PETA ला लगावला आहे. 






@@AUTHORINFO_V1@@