वादग्रस्त नेता साहिल सय्यदला अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jul-2020
Total Views |

Sahil Sayyad _1 &nbs




नागपूर : साहिल सय्यदला अटक होताच अनेकांच्या मनात धडकी भरली आहे. राजकीय वर्तुळासह गुन्हेगारी विश्‍वातही खळबळ उडाली आहे. आता साहिल पीसीआरमध्ये पोलिसांसमोर पोपटासारखा बोलणार आहे. अनेक जण आता गुन्हे शाखेच्या फेऱ्यात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. उपराजधानीत महिन्याभरापासून चर्चित असलेला वादग्रस्त नेता बगदादीयानगरमध्ये राहणारा साहिल ऊर्फ समीर खुर्शिद सय्यद याला रविवारी गुन्हे शाखा पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. 



साहिल पत्नीला भेटायला आला होता. पोलिसांना गुंगारा देऊन फरार होण्याच्या तयारीत असतानाच गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल सय्यदविरुद्ध मानकापूरमधील ऍलेक्‍सिस हॉस्पिटलमधील डॉक्‍टराला धमकी देणे, फसवणूक करणे आदींसह तीन गुन्हे दाखल आहेत. ऑक्‍टोबर २०१८ मध्ये साहिल सय्यद, गिरीश गिरीधर, संदीप बन्सोड व त्यांच्या तीन साथीदारांनी समुद्रपूर येथील डॉ. शशांक नत्थुजी चौधरी यांना पिस्तूल दाखवून ठार मारण्याची धमकी दिली.


जबरदस्तीने भूखंडाच्या दस्तऐवजावर त्यांची स्वाक्षरी व अंगठ्याचे ठसे घेतले. हा भूखंड संदीप बन्सोड याच्या नावे केला. याबाबत चौधरी यांनी गुन्हे शाखा पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी सय्यद व त्याच्या टोळीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. यासह दोन गुन्ह्यांत साहिल हा पोलिसांना हवा होता. साहिल हा घरी आल्याची माहिती गुन्हेशाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांना मिळाली. डॉ. निलेश भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्‍त राजमाने यांच्या पथकातील पोलिस कर्मचारी प्रवीण रोडे, सागर ठाकरे, सूरज व आशिष हे साहिल याच्या घरी गेले.



पोलिसांना बघताचा साहिल हा घरामागील भिंतीवरून उडी मारुन पळण्याच्या प्रयत्न करू लागला. पोलिसांनी त्याला पकडले. साहिल याला पाचपावलीतील गुन्ह्यात अटक करण्यात आली. सोमवारी साहिल याला न्यायालयात हजर करुन पोलिस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी साहिल सैयद याचे जवळपास 20 फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोंमध्ये साहिल हा सर्वच मोठ्या पक्षातील मोठमोठ्या नेत्यांसोबत आहे. त्यामुळे साहिल हा नेमका कुणाचा? असा प्रश्‍न पडला आहे. साहिल हा मोठा "सेटलर' असून पैशासाठी तो कोणत्याही स्तराला जाऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.



देवेंद्र फडणवीस यांनी यावर एक पत्र अनिल देशमुख यांना दिले आहे. या प्रकरणी व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची चौकशी करा, या क्लिपमध्ये आपलाही उल्लेख आहे. अनिलबाबू! आपण राज्याचे गृहमंत्री आहात. कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी आपल्याकडे आहे. अशा वेळी कायद्याच्या चौकटीत बसणारी भूमिका आपण घेणे अपेक्षित आहे, असा टोलाही गृहमंत्र्यांना लगावला आहे. 



साहिल सय्यद हा भाजपचा कार्यकर्ता, असे विधान आपण फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्र्यांनी केले आहे. हे आपण कसे सिद्ध करू शकता? साहिलचे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबरचे फोटो व्हायरल होत आहेत. राष्ट्रवादीच्या आंदोलनात तो दिसतो. कुठल्याही पक्षाचा सक्रिय सदस्य व्हायचे तर तसे अधिकृत सदस्य व्हावे लागते. साहिल तसा सदस्य आहे याची आपण खात्री करून घेतली होती का? कळते, समजते अशी बेभरवशाची भाषा एखाद्या गॉसिपवाल्या बातमीला शोभते; पण राज्याचे गृहमंत्री त्यांच्या पत्रात, ‘बावनकुळे, देशमुख हे साहिलचे व्यावसायिक भागीदार असल्याचे कळते’, असे विधान कसे करू शकतात?, असा जाब त्यांनी गृहमंत्र्यांना विचारला आहे. 



कदाचित अनिलबाबूंकडे त्यासंबंधीचे पुरावे असतील तर ते त्यांनी जाहीर करायला हवेत. देशमुख यांनी फडणवीस यांना लिहिलेले पत्र सोशल मीडियात व्हायरल झाले; पण ते आपल्यापर्यंत अद्याप पोहचलेले नाही, असे फडणवीस यांनीच स्पष्ट केले आहे. देशमुखांच्या या पत्राला फडणवीस यांनी सुसंस्कृत, सभ्य शब्दात उत्तर दिले आहे. साहिल सय्यद याचे सर्वच पक्षांच्या नेत्यांसोबत फोटो आहेत. त्यामुळे अमुक एका पक्षाच्या नेत्याबरोबर फोटो आहे पण तो त्या पक्षाचा कार्यकर्ता झाला असे होत नाही.



आपला परिचय जुना आहे. मंत्रिपदाचे गांभीर्य असलेले नेते म्हणून मी आपल्याकडे पाहतो. सदर क्लिपमध्ये केवळ हनिट्रॅपचा विषय नाही तर गृहमंत्र्यांनी फोन केल्याने आरोपी सुटले, न्यायव्यवस्था कशी मॅनेज केली यासंबंधीचे गंभीर विषय त्यात आहेत. या गंभीर आरोपांकडे दुर्लक्ष करून केवळ राजकारण केले जात असेल तर ते गंभीर आणि दुर्दैवी आहे. बावनकुळे यांनी मला पत्र देऊन त्यांची साहिल सय्यदशी व्यावसायिक भागीदारी नसल्याचे स्पष्ट केले आहे. आॅडिओ क्लिपची चौकशी आपण केली नाही तर मला उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे चौकशीची मागणी करावी लागेल, असे प्रत्युत्तर फडणवीस यांनी गृहमंत्र्याना दिले आहे.





@@AUTHORINFO_V1@@