स्वच्छ राहा, सुरक्षित राहा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jul-2020
Total Views |


Health_1  H x W


 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘आरोग्य’ हा विषय वैश्विकद़ृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरला आहे. सार्वजनिक स्वच्छता हे सार्वजनिक आरोग्याचे एक महत्त्वाचे अंग आहे. आरोग्यसंपन्न किंवा निरोगीय पर्यावरणीय परिस्थितीनिर्माण करण्याची कृती किंवा प्रक्रिया म्हणजे ‘सार्वजनिक स्वच्छता’ होय़ ‘सार्वजनिक आरोग्य’ म्हणजे समाजाच्या किंवा एकूण लोकसंख्येच्या आरोग्याची अवस्था होय. लोकांच्या आरोग्याचे रक्षण करणे, त्याची गुणवत्ता वाढवणे व ते सुधारणे यासाठी समाजाने संघटित केलेल्या प्रयत्नांना ‘सार्वजनिक आरोग्य’ म्हणतात.


आपल्या मनात सामाजिक आरोग्य या विषयाला तितकं महत्त्वाचं स्थान आलेलं दिसत नाही. आपली ‘आरोग्या’ची संकल्पना आजही ’माझा आहार, माझा व्यायाम, माझी तब्येत, माझी औषधं, माझे डॉक्टर आणि माझा आरोग्य विमा’ अशा एका संकुचित वर्तुळात अडकलेली आहे. खरंतर आपल्या आजुबाजूच्या अत्यंत सामाजिक घटकांवर आफलं आरोग्य अवलंबून असतं. आपलं सामाजिक आरोग्य टिकावं म्हणून प्रत्येक देश काही ना काही उपाययोजना करीत असतो. जगाच्या कानाकोपर्‍यात चाललेले वेगवेगळे प्रयोग समजवून घेणं आणि त्यातील यशस्वी आणि अपयशी मार्गाचं विश्लेषण करणं आणि आपल्या देशाच्या विशिष्ट गरजांनुसार ते स्वीकारुन अंमलबजावणी करणं हे सामाजिक आरोग्याच्या द़ृष्टीने महत्त्वाचे आहे. एकंदरीत सामाजिक आरोग्याबाबत बोलायचे तर आपल्याकडील स्थिती ही ‘थोडासा मीठा और बहुत कुछ खट्टा’ अशी आहे़

‘सार्वजनिक स्वच्छता’ हे जसे सार्वजनिक आरोग्याचे एक महत्त्वाचे अंग आहे, तसे ‘वैयक्तिक स्वच्छता’ हेदेखील सार्वजनिक स्वच्छतेचे अंग ठरते़ रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी पर्यावरणाचे नियमन करणार्‍या यंत्रणा विविध प्रयत्न करतात. असे प्रयत्न सार्वजनिक स्वच्छतेचे भाग असतात. सार्वजनिक स्वच्छतेत वैयक्तिक स्वच्छताही अंतर्भूत असते. कारण, वैयक्तिक स्वच्छतेमुळे समाजाचे रोगापासून रक्षण करणार्‍या कामाला मदत होते. ही सर्व यंत्रणा व्यापक स्वरुपात कामं करताना आढळते. जसे अनेक प्रकारचे व्यवसाय व विविध शासकीय यंत्रणा समाजाच्या आरोग्य रक्षणासाठी एकत्रितपणे काम करतात. पिण्याच्या तसेच वापरायच्या पाण्यावर संस्करण करणारी सयंत्रे, सांडपाण्यावर संस्करण करणारी यंत्रे तयार करणे व ही सयंत्रणे चालू ठेवणे ही कामे स्वच्छता अभियंते करतात. निरोगी पर्यावरण वृद्घिंगत करणार्‍याला साहाय्यभूत ठरतील असे कायदे तयार करुन त्यांची अंमलबजावणी करण्याचे काम शासकीय यंत्रणा करतात़ अन्न व खाद्य पदार्थांवर संस्करण व प्रक्रिया करणे आणि त्यांचे वाटप करणे, घनकचर्‍याची विल्हेवाट लावणे, तसेच पाण्यावर वा वाहित मलावर संस्करण करणे ही सार्वजनिक स्वच्छतेची कार्ये आहेत, शिवाय हवेचे प्रदूषण व क्रुतक (कुरतडणारे) प्राणी यांचे नियंत्रण करण्याचे कामही सार्वजनिक स्वच्छतेत येते.
चांगल्या आरोग्य सवयींमुळे विशेषत: डायरियापासून बचाव होऊ शकतो. सर्व प्रकारचा मल शौचकूप किंवा शौचालयात फेकणे, मुलाच्या मलाशी संपर्क झाल्यानंतर किंवा मुलांंना खायला देण्याआधी किंवा खाद्यपदार्थ स्पर्श करण्यापूर्वी हात साबण आणि पाण्यासह चांगले धुवून घ्यावे किंवा राख आणि पाण्याने धुतले तरी चालतात. कोणताही मल चांगल्याप्रकारे साफ करणे आणि पशूंचा मल, घर किंवा रस्ता, विहीर आणि मुलांच्या खेळायच्या जागेपासून खूप दूर ठेवावेत. सर्वांनी एकत्रित होऊन शौचकूप बनवावेत आणि त्याचा वापर करावा. जलस्रोतांचे संरक्षण करणे आणि कचरा तसेच घाण पाणी यासारख्या वस्तूंची सुरक्षित विल्हेवाट लावण्याची आवश्यकता आहे. सरकारद्वारे समाजाला स्वस्त दरात शौचकूप आणि संडास बनवण्यासाठी आवश्यक सूचना देणे आवश्यक आहे़ कारण, हे सर्व कुटुंबाद्वारे वहनीय आहे. नागरी क्षेत्रात कमी खर्चिक ड्रेनेजची सुव्यवस्था, सुधारित पेय जलपूर्ती आणि कचरा गोळा करणे यासारख्या कामांसाठी सरकारी मदतीची गरज असते. सगळ्याच बाबी सरकारवर ढकलण्यात काही अर्थ नाही़. काही बाबी व्यक्तिगत स्वच्छता, कौटुंबिक स्वच्छता या अंतर्गत येतात. मुळात अन्न शिजवताना विशेष काळजी घ्यायला हवी. अन्न शिजवतानाच थोडीशी काळजी घेतली तर कुटुंबाला अन्नतून होणार्‍या विषबाधेपासून आजारापासून दूर ठेवू शकतो. गोष्टी साध्या असतात, पण त्या न पाळल्याने रोगाला आपण निमंत्रण देतो. कधीकधी व्यक्तिगत-कौटुंबिक अस्वच्छतेमुळे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येऊ शकते़ म्हणून सावध राहा़ काळजी घ्या!
 

- संजीव पेंढरकर

@@AUTHORINFO_V1@@