कोरोना कहर - भाग-१८- ‘कार्बोव्हेज’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jul-2020
Total Views |


Cargo veg_1  H



होमियोपॅथीच्या औषधांबद्दल सर्वात मोठा गैरसमज आहे की, लोकांना वाटते की होमियोपॅथीची औषधे संथ काम करतात व पटकन प्रभाव दाखवत नाहीत. परंतु, असे अजिबात नाही. होमियोपॅथीची औषधेसुद्धा आपत्कालात फार त्वरित आणि गुणकारी पद्धतीने उपयोगी पडतात. ‘कोविड-१९’च्या साथीमध्ये जेव्हा एखाद्या रुग्णाची प्रकृती गंभीर होते, त्यावेळी काही महत्त्वाची होमियोपॅथीक औषधे वापरल्यास या गंभीर आजारावरही मात करता येते. कोरोनाच्या गंभीर परिणामाला उपयुक्त असे एक औषध आज आपण पाहणार आहोत आणि ते म्हणजे ‘कार्बोव्हेजीटॅबिलीस’ अथवा ‘कार्बोव्हेज’ (carbo veg).


 
‘कार्बोव्हेज’ हे औषध कोळशापासून बनवण्यात येते. कोळसा हा मूलत: प्राणवायूशी अपूर्ण संयोगामुळे तयार झालेला पदार्थ आहे, त्यामुळे प्राणवायूशी अपूर्ण संयोग (दम लागणे, श्वसनांचे विकार इत्यादी) व त्यामुळे होणारे शारीरिक पेशींचे विघटन हा या औषधाचा मुख्य गुणधर्म आहे. या औषधामध्ये दुर्गंधीनाशक व जंतुनाशक असे गुण आहेत. या औषधाचा मुख्य परिणाम हा रक्तवाहिन्या, रक्तभिसरण संस्था यांच्यावर होत असतो. रक्ताभिसरण संथ होऊन शरीर थंड पडणे, काळे-निळे पडणे अशी लक्षणे दिसू लागतात. रक्ताभिसरण संथ झाल्यामुळे प्राणवायूचा पुरवठा कमी झाल्याने वरील प्रकारचा त्रास संभवतो. शरीराची चैतन्यशक्ती व कार्यशक्ती अतिशय खालावलेली असते. गंभीर स्वरुपाच्या आजारात, अतिरक्तस्राव होऊन, अतिसार होऊन रुग्ण अतिशय थकून जातो व त्याच्या शरीरातील त्राणच निघून जातात, प्रतिजैविकासारख्या अतिशय प्रखर औषधांच्या दुष्परिणामामुळे रुग्णाची कार्यशक्तीच संपून जाते व रूग्ण अतिशय थकून जातो.


‘कार्बोव्हेज’ हे औषध जास्त लागू पडणार्‍या व्यक्ती या साधारणपणे स्थूल, संथ, आळशी असतात व जुनाट प्रकारच्या लक्षणांचे आजार त्यांना होऊ शकतात. कुठल्याही प्रकारच्या गंभीर आजारात पूर्णपणे कोसळणे, कोलमडून जाणे हे मुख्य लक्षण आहे. जेव्हा रुग्ण कोसळतो, त्यावेळी तो जणू मृत झालाय की काय, असे वाटण्याइतपत त्याची अवस्था होते. शरीराची काहीही हालचाल होत नाही. शरीर थंडगार पडते. श्वासात पण थंडपणा जाणवतो. रुग्णाच्या नाडीचे ठोकेही नीट लागत नाहीत. श्वासोच्छवासाचा वेग फार वाढतो. रुग्ण घुसमटू लागतो व सतत जवळून वारा घालण्यास किंवा पंख्याखाली बसवण्यास सांगतो. रुग्णाला धाप लागते. नीट श्वास घेण्याच्या प्रयत्नातच रुग्ण थकून जातो. रुग्णाला थंडीत त्रास होतो, पण अशा वेळी त्यास पंख्याची गरज असते. रुग्णाला फार जंतुसंसर्ग होऊन सेप्टीक होण्याची वेळ येते, त्यावेळी ‘कार्बोव्हेज’ फार उपयोगी ठरते. रुग्णाला खालील प्रकारामुळे त्रास होतो. जसे, उष्णता, जुनाट आजार तसेच पचण्यात जड असे पदार्थ खाल्ल्याने रुग्णाला त्रास होतो, तसेच खराब झालेले अन्न खाऊनही त्याला त्रास होतो. अतिश्रम, घट्ट कपडे घातल्यामुळे, वातावरणातील बदलामुळे व साधारणपणे वयस्कर व थकलेल्या लोकांना जास्त त्रास होतो. त्याचप्रमाणे ढेकर आल्यामुळे थंड हवेत, पंख्याच्या जवळ बसण्याने, पाय वर केल्याने, थंड पदार्थ खाल्ल्याने रुग्णाला आराम मिळतो. मानसिक लक्षणांमध्ये हा रुग्ण भित्रा असल्याचे दिसते. आळशी व संथपणे विचार करणारा, दुःखी, असा असतो. स्मरणशक्ती फार कमी होते. रुग्ण भित्रेपणामुळे खूप दचकतो.


या औषधाचा परिणाम फुफ्फुसांवर व श्वसन संस्थेवरही होत असल्यामुळे त्या अनुषंगाने रुग्णात लक्षणेही दिसतात. जोरदार खोकला येणे, त्याचबरोबर डोकेदुखी व उलटी होणे, धाप लागणे, दमा होणे अशी लक्षणे दिसतात. घट्ट कफ बाहेर पडतो. तापामध्येसुद्धा रुग्ण बर्फासारखा थंडगार पडतो, डोके गरम लागते पण हातपाय थंड असतात. रुग्णाला सारखा घाम येतो. रुग्ण फार घाबरतो व स्वतःलाच दोष देत राहतो, गोंधळलेल्या व दुःखी अवस्थेत असतो. रुग्णाने उत्सर्जित केलेल्या लघवी व शौचाला तसेच घामाला फार दुर्गंधी येते. तापात सारखा घाम येतो व थंडी वाजते, पण तरीही त्यास पंखा हवा असतो. अंग आतून फार तापते. पण बाहेर अंग थंड लागते. ही व अशी लक्षणे जुळत असल्यास ‘कार्बोव्हेज’ कुठलाही आजार बरे करण्याची क्षमता ठेवते. पुढील भागात आपण ‘कोरोना-१९’च्या उपचाराबद्दल अजून विस्ताराने माहिती पाहूया.
 

- डॉ. मंदार पाटकर

 
@@AUTHORINFO_V1@@