पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jul-2020
Total Views |

PM modi and putin_1 


नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियन महासंघाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि दुसऱ्या महायुद्धातील विजयाच्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल आणि रशियाच्या घटना दुरुस्तीवरील मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल पुतीन यांचे अभिनंदन केले.


२४ जून २०२०रोजी मॉस्को येथे आयोजित केलेल्या लष्करी संचलनात भारतीय पथकाचा सहभाग म्हणजे रशिया आणि भारताच्या जनतेमध्ये असलेल्या घनिष्ठ मैत्रीचे प्रतीक असल्याचे पंतप्रधानांनी त्यांना सांगितले. कोविड-१९ च्या जागतिक महामारीच्या नकारात्मक परिणामांना तोंड देण्यासाठी दोन्ही देशांनी केलेल्या प्रभावी उपाययोजनांची दोन्ही नेत्यांनी नोंद घेतली आणि कोविड १९ च्या पश्चात जगात निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत आणि रशिया यांच्यातील अतिशय दृढ संबंध महत्त्वाचे असल्याबाबत सहमती व्यक्त केली. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबध आणि चर्चांचे सत्र पुढे कायम राखण्याबाबत आणि त्याचाच परिणाम म्हणून या वर्षाच्या अखेरीला भारतात द्विपक्षीय शिखर परिषदेच्या आयोजनाबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली.


या द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी अध्यक्ष पुतीन यांचे स्वागत करण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे पंतप्रधानांनी त्यांना सांगितले. पंतप्रधानांनी केलेल्या दूरध्वनीबद्दल रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी त्यांचे आभार मानले आणि दोन्ही देशांदरम्यान सर्व क्षेत्रातील विशेष आणि अतिशय सन्मानाची धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
@@AUTHORINFO_V1@@